दुसरा संसार होईल सुखाचा, घटस्फोटानंतर लग्न जुळण्याची चिंता आता सोडा! फक्त एक काम करा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
फार कमी व्यक्ती अशा असतात ज्यांचं अगदी सहज दुसरं लग्न जुळतं आणि त्यांचा संसारही सुखाचा होतो. परंतु आपला घटस्फोट झाला असेल आणि आता लग्न जुळण्यात अडचणी येत असतील, तर काळजी नसावी.
मोहन ढाकले, प्रतिनिधी
बुरहानपूर : सर्वकाही ठीक असतं, आपण नाकी-डोळी नीटस असतो, शिक्षण उच्च असतं पण तरीही लग्न जुळण्यात अडचणी येतात. अनेकजणांना या समस्येला सामोरं जावं लागतं. विविध उपाय करूनही योग्य वयात लग्न जुळत नाही, परंतु लग्न झालेलं नसतं तोपर्यंत हे प्रयत्न करणं फार कठीण वाटत नाही. मात्र जेव्हा एकदा झालेलं लग्न मोडल्यानंतर दुसऱ्यांदा लग्न जुळवायचं असतं, तेव्हा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. मग आपली मुलाकडची बाजू असली किंवा मुलीकडची असली तरी नकार पचवावे लागतात.
advertisement
फार कमी व्यक्ती अशा असतात ज्यांचं अगदी सहज दुसरं लग्न जुळतं आणि त्यांचा संसारही सुखाचा होतो. परंतु आपला घटस्फोट झाला असेल आणि आता लग्न जुळण्यात अडचणी येत असतील, तर काळजी नसावी. यावरही उत्तम उपाय आहेत. तज्ज्ञ सिद्धी बरोले सांगतात की, आयुष्यात दुसऱ्यांदा संसार थाटायचा असेल, तर बेडरूममध्ये दोन उपाय करणं आवश्यक आहे.
advertisement
त्यापैकी पहिला उपाय असा की, ज्या बेडरूममध्ये आपण झोपता त्याच्या नैऋत्य दिशेत स्वतःचा फोटो लावा. कमीत कमी 51 दिवस हा फोटो भिंतीवर असायला हवा. तर, दुसरा उपाय असा आहे की, हंस पक्ष्याच्या जोडीचा एक फोटो बेडरूममध्ये लावा. हंस पक्षी हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो. त्याचा फोटो कमीत कमी 48 दिवस बेडरूममध्ये असायला हवा. त्यामुळे आपला विवाहयोग जुळून येईल. इतकंच नाही, तर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार मिळेल.
advertisement
'या' गोष्टी ठेवा ध्यानात
आपण हे दोन उपाय करत असाल, तर या गोष्टीची काटेकोरपणे काळजी घ्या की, हे दोन्ही फोटो आपल्याला दिवसाच्या उजेडात लावायचे आहेत. शिवाय त्यावेळी मनात अतिशय प्रेमळ भावना असायला हव्या. 'मला एक चांगला जोडीदार मिळूदे, मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळूदे', अशा भावना मनात ठेवायच्या आहेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Burhanpur,Madhya Pradesh
First Published :
February 25, 2024 6:29 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
दुसरा संसार होईल सुखाचा, घटस्फोटानंतर लग्न जुळण्याची चिंता आता सोडा! फक्त एक काम करा