हनुमान चालीसा नियमित का वाचावी? नीम करोली बाबांनी सांगितले होते प्रभावशाली महत्व
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Neem Karoli Baba: नीम करोली बाबा हे भारतातील एक अत्यंत पूजनीय व चमत्कारी संत होते. त्यांचे व्यक्तिमत्व साधं, सोज्वळ आणि भक्तीमय होतं.
मुंबई : नीम करोली बाबा हे भारतातील एक अत्यंत पूजनीय व चमत्कारी संत होते. त्यांचे व्यक्तिमत्व साधं, सोज्वळ आणि भक्तीमय होतं. त्यांना हनुमानजींचे परम भक्त मानलं जातं. ते नेहमीच रामनामाचा जप करत आणि सतत सांगत "राम जपा करो, राम!"
नीम करोली बाबा आणि 'कैंची धाम'
उत्तराखंडातील नैनीतालच्या जवळील कैंची धाम हे त्यांचं प्रसिद्ध आश्रमस्थान आहे. बाबा पहिल्यांदा 1961 साली या ठिकाणी आले होते आणि 1964 साली त्यांनी या ठिकाणी आश्रमाची स्थापना केली. बाबा नीम करोली यांचे समाधी स्थळ पंतनगरजवळ वसले आहे.
या ठिकाणी एक भव्य हनुमान मंदिर, नीम करोली बाबांची मूर्ती आणि समाधी आहे. असं म्हणतात की या ठिकाणी आलेला कुणीही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही.त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
advertisement
हनुमान चालीसेबद्दल काय सांगितलं होतं बाबांनी?
बाबा नीम करोली यांना हनुमानजींचा अवतार मानलं जातं. त्यांनी आपल्या भक्तांना हनुमान चालीसा हे महामंत्र मानावं असं आवर्जून सांगितलं होतं. त्यांच्या मते, हनुमान चालीसा रोज नित्यपणे वाचल्याने जीवनातील सर्व संकटं दूर होतात, मनाला शांती, कुटुंबाला समृद्धी आणि भक्ताच्या जीवनात यश प्राप्त होतं. त्यांनी असंही म्हटलं होतं की, हनुमान चालीसा वाचणारा माणूस धनवान होतो आणि त्याचं जीवन सुखकर होतं.
advertisement
108 हनुमान मंदिरांची स्थापना
समर्थ रामदास स्वामींनंतर हनुमान मंदिरांच्या स्थापनेत सर्वाधिक योगदान देणारे संत म्हणून बाबा नीम करोली यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी 108 हनुमान मंदिरांची स्थापना केली, ज्यामध्ये कैंची धाम आश्रमाचा समावेश होतो.दरवर्षी 15 जून रोजी येथे भव्य मेळा भरतो.जिथे देश-विदेशातून हजारो भक्त येतात.
देशविदेशातील भक्तांसाठी श्रद्धास्थान
view commentsकैंची धाम हे आश्रम फक्त भारतातच नव्हे तर विदेशातील भक्तांसाठीही एक आस्थेचे स्थान बनले आहे. अमेरिकेतील ऍपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांनीही बाबा नीम करोली यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे अनेकदा सांगितले गेले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
हनुमान चालीसा नियमित का वाचावी? नीम करोली बाबांनी सांगितले होते प्रभावशाली महत्व


