Ram Mandir Ayodhya: अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याचा पगार किती? अशा सोयी-सुविधाही मिळतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Mandir ayodhya: आज देशभरात रामनवमी साजरी केली जात आहे. अयोध्येतील भव्य मंदिरात श्री रामाला सूर्यटिळा लावण्याचा विधी करण्यात आला. अयोध्येतील भव्य श्री राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ रोजी झाले. या ऐतिहासिक क्षणासोबतच मंदिरात श्री रामाचा औपचारिक अभिषेकही झाला.
नवी दिल्ली : आज देशभरात रामनवमी साजरी केली जात आहे. अयोध्येतील भव्य मंदिरात श्री रामाला सूर्यटिळा लावण्याचा विधी करण्यात आला. अयोध्येतील भव्य श्री राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ रोजी झाले. या ऐतिहासिक क्षणासोबतच मंदिरात श्री रामाचा औपचारिक अभिषेकही झाला.
अलीकडेच, मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनानंतर, पंडित मोहित पांडे यांची मंदिराचे नवीन मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता ते श्री रामाची दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधींची काळजी घेत आहेत. अयोध्येच्या राम मंदिरातील पुजाऱ्यांना किती पगार मिळतो, या बाबत जाणून घेऊ.
दरमहा किती पगार मिळतो?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम मंदिराचे मुख्य पुजारी पंडित मोहित पांडे यांना ३२,९०० रुपये वेतन दिले जाते. तर सहायक पुजाऱ्यांना ३१ हजार रुपये पगार मिळतो. पूर्वी हे वेतन २५ हजार रुपये होते. तर सहायक पुजाऱ्यांचा पगार २० हजार रुपये होता.
advertisement
इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
वृत्तानुसार, पगाराव्यतिरिक्त, पंडित मोहित पांडे यांना ट्रस्टकडून इतर धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित आवश्यक सुविधा, निवास, प्रवास सुविधा आणि विशेष धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची व्यवस्था देखील पुरविली जाते.
सामवेदातील अभ्यास - अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी मोहित पांडे यांनी पुजारी पदासाठी आवश्यक असलेले वैदिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सामवेदातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून आचार्य ही पदवी प्राप्त केली. मोहित पांडे यांनी अनेक वर्षांपासून दूधेश्वर वेद विद्यापीठात धर्म आणि कर्मकांडांचा सखोल अभ्यास केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 06, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir Ayodhya: अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याचा पगार किती? अशा सोयी-सुविधाही मिळतात