Ramayan : तुम्हाला माहिती आहे का? प्रभू श्रीरामांची एक बहीणही होती, तिचं नाव काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ramayan Story : रामायण हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान राम, सीता आणि रावणाची कथा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भगवान रामांना एक बहीणही होती?
नवी दिल्ली : रामायण म्हटलं की राम, लक्ष्मण, सीता, कैकेयी, कौशल्या, हनुमान, रावण ही पात्रं प्रामुख्याने आठवतील. पण रामायणात अशी काही पात्र आहेत, ज्यांचा उल्लेख फार केला जात नाही. किंबहुना बहुतेकांना ती माहितीही नसतील. आता रामाला किती भावंडं असं विचारलं तर साहजिक लक्ष्मण आणि भरत या दोघांचीच नावं तोंडी येतात. पण त्यांना एक बहीणही होती हे तुम्हाला माहिती आहे का?
भगवान रामांच्या 2 भावांबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की रामाला एक बहीणही होती. राजा दशरथ यांचं पहिलं अपत्य एक कन्या होतं. राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांची ही मुलगी. म्हणजे भगवान श्रीरामांना मोठी बहीण होती. पुराणानुसार ती प्रत्येक कामात पारंगत होती. बुद्धिमान असण्यासोबतच ती अनेक कामांमध्येही कुशल होती.
advertisement
पौराणिक कथेनुसार एकदा राणी कौशल्याची बहीण वर्षानिनी तिचा पती आणि अंगदेशचा राजा रोमपादासह अयोध्येत आली होती. त्यावेळी वर्षानिनी निपुत्रिक होती. संततीच्या आनंदापासून वंचित राहिल्यामुळे राजा रोमपद आणि वर्षानिनी खूप दुःखी होते. राजा दशरथांसमोर त्यांनी आपली व्यथा मांडली. राजा दथरथांनी त्यांना दुःखी आणि निराश पाहूनसहानुभूती व्यक्त केली आणि त्यांची मुलगी त्यांना दत्तक दिली. त्या मुलीला घेऊन राजा रोमपाद आणि वर्षानिनी अंगदेशात परतले. यानंतर ती मुलगी अंगदेशाची राजकुमारी बनली.
advertisement
पुढे जाऊन श्रीरामांच्या या मोठी बहिणीचा विवाह ऋषी श्रिंग यांच्याशी झाला. यांच्या लग्नाबद्दल अनेक लोकप्रिय कथा आहेत. ऋषी श्रींग यांनी राजा दशरथासाठी पुत्रयष्टी यज्ञ केला होता. त्यामुळे राजा दशरथाला पुत्र झाले. असं मानलं जातं की हिमाचल प्रदेशातील कुल्लू इथं ऋषी श्रृंग यांचं एक मंदिर आहे. जिथे ऋषी श्रृंग आणि राम यांच्या बहिणीची पूजा केली जाते.
advertisement
आता प्रभू श्रीरामांची बहीण कोण होती? तिचं नाव काय? .याबाबत तुम्हाला काही कल्पना आली का? आठवलं का? तुम्ही सांगू शकता का? तर तिचं नाव होतं शांता.
Location :
Delhi
First Published :
April 16, 2025 6:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ramayan : तुम्हाला माहिती आहे का? प्रभू श्रीरामांची एक बहीणही होती, तिचं नाव काय?


