Shani Pradosh Vrat 2024: परिघ योगात शनी प्रदोष! महिन्याच्या शेवटी शिव-शनीची पूजा करण्याचा दुर्मीळ संयोग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Pradosh Vrat 2024: ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्या मते, शनी प्रदोष व्रत केल्यास पुत्रप्राप्ती होते. जे निपुत्रिक आहेत त्यांनी शनी प्रदोष व्रत करून शंकराची पूजा करावी. जाणून घेऊया शनी प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र इत्यादी.
मुंबई : श्रावण कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत शनिवार, 31 ऑगस्ट रोजी आहे. प्रदोष शनिवारी येत असल्यानं ते शनिप्रदोष व्रत आहे. व्रत आणि उपासनेच्या वेळी परिघ योग तयार होत आहे. संध्याकाळी शनी प्रदोष व्रताची पूजा केली जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्या मते, शनी प्रदोष व्रत केल्यास पुत्रप्राप्ती होते. जे निपुत्रिक आहेत त्यांनी शनी प्रदोष व्रत करून शंकराची पूजा करावी. जाणून घेऊया शनी प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र इत्यादी.
शनि प्रदोष व्रत 2024 मुहूर्त आणि योग -
श्रावण कृष्ण त्रयोदशी तिथीची सुरुवात: 31 ऑगस्ट, शनिवार, पहाटे 02:25 वाजता
श्रावण कृष्ण त्रयोदशी तिथीची समाप्ती: 1 सप्टेंबर, रविवार, पहाटे 03:40
शनि प्रदोष पूजा मुहूर्त: शनिवार संध्याकाळी 06:43 ते रात्री 08:59
परिघ योग: संध्याकाळी 05:39 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 05:50 पर्यंत
पुष्य नक्षत्र : सकाळी 07:39 पर्यंत
advertisement
शनि प्रदोष व्रत सोडण्याची वेळ: 1 सप्टेंबर, सकाळी 5:59 नंतर
शनि प्रदोष व्रत 2024 पूजा पद्धत -
शनि प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून व्रत आणि शिव पूजा करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर दिवसभर फलाहारावर राहावे. त्यानंतर संध्याकाळी शिवमंदिरात जावे किंवा घरी महादेवाची पूजा करावी. सर्व प्रथम महादेवाला गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगावर अक्षत, बेलपत्र, चंदन, फुले, फळे, भांग, धतुरा, नैवेद्य, मध, धूप, दिवा इत्यादी अर्पण करा. या दरम्यान पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय जपत राहावे.
advertisement
त्यानंतर शिव चालिसा पठण करावे. त्यानंतर शनि प्रदोष व्रताची कथा वाचावी. पूर्ण झाल्यावर कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान शंकराची आरती करा. पूजेच्या शेवटी चुकीसाठी क्षमा मागून मूल होण्यासाठी आशीर्वाद घ्यावा. रात्री जागरण करू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पूजा करावी. नंतर ब्राह्मणांना दान आणि दक्षिणा देऊन तृप्त करावे. त्यानंतर उपवास सोडून व्रत पूर्ण करावे.
advertisement
शनि प्रदोष व्रताच्या कथेनुसार, जो कोणी हे व्रत खऱ्या मनाने पाळतो त्याला उत्तम संतती प्राप्त होते. एका निपुत्रिक जोडप्यानं विधीनुसार हे व्रत पाळले आणि परिणामी त्यांना पुत्रप्राप्ती झाली असे, कथेत सांगितले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2024 2:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani Pradosh Vrat 2024: परिघ योगात शनी प्रदोष! महिन्याच्या शेवटी शिव-शनीची पूजा करण्याचा दुर्मीळ संयोग


