Shattila Ekadashi: षटतिला एकादशीला तिळाचे करा 5 सोपे उपाय! व्रताचे मिळेल इच्छिच फळ, पुण्यकर्मानं स्वर्गप्राप्ती

Last Updated:

Shattila Ekadashi Astro Tips: काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ षटतिला एकादशीला तिळाचे कोणते उपाय करावेत, ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते.

News18
News18
मुंबई, 31 जानेवारी : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचं व्रत केलं जातं. यंदा षटतिला एकादशीचं व्रत 06 फेब्रुवारीला आहे. त्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी आणि रात्री जागरण करावे. षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ वापरणे शुभ मानले जाते. एकादशी तिथी 05 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05:24 ते 06 फेब्रुवारी सायंकाळी 04:07 पर्यंत आहे. त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजीत मुहूर्त दुपारी 12:30 ते दुपारी 01:15 पर्यंत आहे. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊ षटतिला एकादशीला तिळाचे कोणते उपाय करावेत, ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते.
षटतिला एकादशी: तीळ वापरून 5 सोपे उपाय
1. षटतिला एकादशीच्या दिवशी गंगाजलात तीळ मिसळून स्नान करावे. शक्य असल्यास हिवाळ्यात तिळाचं उटणं करून लावावं. असं केल्यानं व्यक्ती निरोगी राहते आणि पापे नष्ट होतात. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर हे करणे टाळा.
2. षटतिला एकादशीच्या दिवशी पूजेनंतर तिळाचे दान करावे. या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितकी जास्त वर्षे तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते. तिळाचे दान केल्यानं दारिद्र्य, दु:ख आणि दुर्भाग्य दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
3. षटतिला एकादशीच्या निमित्ताने जेवणात तीळ वापरावे. तीळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते.
4. षटतिला एकादशीला तीळ दान करण्यासोबतच काही रुपयेही दान करावेत. यासाठी तिळाच्या लाडूमध्ये काही नाणी टाकून दान करा. हे गुप्त दान तुमचे नशीब मजबूत करेल. प्रसिद्धी आणि यश मिळेल.
advertisement
5. जर तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल, राहू किंवा केतू किंवा पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही षटतिला एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करा. यामुळे तुमचा त्रास दूर होईल.
षटतिला एकादशी 2024 मुहूर्त -
पौष कृष्ण एकादशी तिथी प्रारंभ: 5 फेब्रुवारी, 05:24 PM
पौष कृष्ण एकादशी तिथीची समाप्ती: 6 फेब्रुवारी, दुपारी 04:07 वाजता
advertisement
एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ: 7 फेब्रुवारी, 07:06 AM ते 09:18 AM
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shattila Ekadashi: षटतिला एकादशीला तिळाचे करा 5 सोपे उपाय! व्रताचे मिळेल इच्छिच फळ, पुण्यकर्मानं स्वर्गप्राप्ती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement