दिवाळीच्या रात्री मांत्रिक स्मशानभूमीत तंत्र-मंत्राची सिद्धी का करतात?, काय आहे यामागचं कारण
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
tantrik on diwali - कार्तिक अमावस्येला रात्री एकीकडे लोक भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा दुसरीकडे याचदिवशी मांत्रिकही रात्री उशिरा स्मशानभूमीत जाऊन तंत्र-मंत्राच्या साधनेत लीन राहतात. तंत्रविद्या शिकणारे मांत्रिकही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत राहतात.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिदी
अयोध्या : दिवाळी सणाची सर्वांना आतुरता असतो. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत हा दिवाळी साजरा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरा केली जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की, या दिवशी लंकेवर विजय मिळवून प्रभु राम 14 वर्ष वनवास संपवून अयोध्येला परतले होते. तेव्हा अयोध्यावासियांनी अमावस्येच्या रात्री दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते.
advertisement
कार्तिक अमावस्येला रात्री एकीकडे लोक भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा करतात तेव्हा दुसरीकडे याचदिवशी मांत्रिकही रात्री उशिरा स्मशानभूमीत जाऊन तंत्र-मंत्राच्या साधनेत लीन राहतात. तंत्रविद्या शिकणारे मांत्रिकही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत राहतात.
हिंदू धर्मात अनेक प्रकारच्या विद्या सांगितल्या जातात. यापैकी एक मांत्रिक विद्या आहे. यालाच काळी जादूही म्हटले जाते. पण तंत्रविद्येचा उपयोग कोणत्याही कामात लवकर यश मिळविण्यासाठी किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी केला जातो. त्यामुळे याचा सनातन धर्माशी काही संबंध नाही. दिवाळीच्या रात्री मांत्रिक आपल्या तंत्र-मंत्राची साधना करतात. नेहमी तुम्ही पाहिले असेल किंवा ऐकले असेल की, जादूटोणा याची सिद्धी म्हणजेच तंत्रविद्या ही दिवाळी, गुप्त नवरात्री किंवा कोणत्याही शुभ मुहूर्ताच्या रात्री केली जाते.
advertisement
तंत्र-मंत्र का करतात?
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कार्तिक अमावस्येच्या रात्री मांत्रिकही स्मशानात तंत्र-मंत्राची सिद्धी करतात. या दिवशी लोक शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी, गृहशांतीसाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचा जादूटोणा करतात. तंत्रविद्येनुसार दिवाळीच्या रात्री अनेक अद्भुत शक्ती प्राप्त होतात. जे कल्याणकारी आणि हितकारक आहेत, नेहमी अशाच मंत्रांचा आश्रय घेतला पाहिजे, हे तंत्र-मंत्र सिद्धी करताना लक्षात ठेवायला हवे, असे ते म्हणाले. एखाद्याचे नुकसान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युक्त्या आणि मंत्र यशस्वी ठरतात. मात्र, ते भावी पिढ्यांचे सर्व सुख नष्ट करतात. याचे परिणाम भावी पिढ्यांना भोगावे लागतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
advertisement
चुकूनही ही कामे करू नका -
पंडित कल्कि राम यांनी पुढे सांगितले की, सरस्वती माता हे सौम्यता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. त्याचा मानवाला नेहमीच फायदा होतो. त्यामुळे या अमावस्येच्या रात्रीचा सदुपयोग करावा. आपल्याला सनातन धर्मात वर्णन केलेल्या दैवी मंत्रांचे आणि युक्तीचे पालन करायला हवे. एखाद्याच्या वैयक्तिक स्वार्थामुळे इतरांचे नुकसान करू नये, असेही ते म्हणाले.
advertisement
सूचना - ही माहिती राशीचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी बोलून लिहिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
October 27, 2024 8:04 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
दिवाळीच्या रात्री मांत्रिक स्मशानभूमीत तंत्र-मंत्राची सिद्धी का करतात?, काय आहे यामागचं कारण