Samudra Shastra: नशीबवान असतात या स्त्रिया; शरीरावर अशा ठिकाणी तीळ श्रीमंती आणतात

Last Updated:

Samudra Shastra: अंगावरील तीळ शुभ की अशुभ हे त्याच्या आकार, जागेवरूनही ओळखले जाते. एखाद्या महिलेच्या कपाळावर किंवा भुवयांवर तीळ असल्यास याचा अर्थ काय होतो, जाणून घेऊ.

News18
News18
मुंबई, 27 जानेवारी : वैदिक ज्योतिषशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर आधारित परिणामांचा अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे, सामुद्रिक शास्त्रामध्ये, परिणामांची गणना व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या तिळांच्या आधारे केली जाते. अंगावरील तीळ शुभ की अशुभ हे त्याच्या आकार, जागेवरूनही ओळखले जाते. एखाद्या महिलेच्या कपाळावर किंवा भुवयांवर तीळ असल्यास याचा अर्थ काय होतो, जाणून घेऊ.
कौटुंबिक सुख मिळतं -
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असतो. या महिला दूरदर्शी आणि मैत्रीपूर्ण असतात. तसेच, त्या जीवनात लवकर यश मिळवतात. त्यांना कौटुंबिक सुख मिळते. त्याचबरोबर त्यांना समाजात मान-प्रतिष्ठा मिळते. त्या खूप नाव आणि पैसा कमावतात.
कपाळाच्या मध्यभागी तीळ -
ज्या महिलांच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असतो, त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यांना वैवाहिक जीवनात पूर्ण आनंद मिळतो. मात्र, त्यांना किरकोळ आजार होत राहतात. शिवाय त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. पण श्रीमंती पायाशी राहते. अशा स्त्रियांचे वय जसजसे वाढते तसतसे त्यांचे पैसेही वाढत जातात. परंतु, या महिला थोड्या उधळपट्टी करू शकतात.
advertisement
भुवयांवर तीळ -
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या भुवयांमध्ये तीळ असतो, त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यांचे श्रीमंत कुटुंबात लग्न होतं, त्या सर्व भौतिक सुखसोयींचा आनंद घेतात. नेहमी राणीसारखे राज्य करतात. त्यांच्या हातातही भरपूर पैसा राहतो. ती नेहमी तिच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाते.
advertisement
कपाळावर खालच्या बाजूला तीळ -
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळाच्या खालच्या बाजूला तीळ असतो त्या खूप भावूक असतात. जीवनात यशस्वी होतात. त्यांना आई-वडिलांचे खूप प्रेम मिळते. आयुष्य श्रीमंतीत जगतात. शिवाय, त्या खूप वक्तशीर आणि कलेच्या प्रेमी आणि जाणकार असतात. पैसे वाचवण्यातही त्या निष्णात असतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Samudra Shastra: नशीबवान असतात या स्त्रिया; शरीरावर अशा ठिकाणी तीळ श्रीमंती आणतात
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement