कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य

Last Updated:

चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करीत असून पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

News18
News18
मुंबई, 13 ऑगस्ट: आज दिनांक १३ ऑगस्ट २०२३. रविवार. आज अधिक श्रावण कृष्ण द्वादशी. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करीत असून पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
अचानक दिनक्रमात होणारे बदल आश्चर्य कारक ठरतील. जास्त ताण पडेल. मानसिक कुचंबणा होईल. घराची जबाबदारी राहील. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस. दिवस बरा जाईल.
वृषभ
आज दिवस शांततेने व्यतीत करण्याचा आहे . दशमात शनि वक्री , धन स्थानात ग्रह आर्थिक लाभाचे योग आणतील. प्रकृती जपा. द्वितीय स्थानातील चंद्र घरात आनंद निर्माण करेल. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा.
advertisement
मिथुन
काहीसा सामाजिक ताण उद्भवणार असून ईश्वरी पाठबळ राहील . खर्च खूप होईल. शनि लहान सहान दुखणी देईल. प्रवास टाळा. धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.
कर्क
कर्म स्थानात गुरू राहू योग आहे. राशी स्वामी चंद्र व्यय स्थानात सामाजिक जीवनात खर्चाचे योग आणेल. संततिविषयी ताण अनुभव कराल. गुरूचे पाठबळ व शुक्र नोकरीत चांगले फळ देईल . प्रकृती जपून काम करा. दिवस चांगला .
advertisement
सिंह
राशीस्थानात शुक्र आणि मंगळ प्रलोभानापासून दूर रहा असे सांगत आहे. प्रकृतीची काळजी घ्या.लाभ चंद्र आहे महत्वाचे निर्णय होतील. गुरू भाग्यात उत्तम साथ देईल. दिवस ईश पूजनात घालवा.
कन्या
सामाजिक आणि गृह क्षेत्रात काही कटकटी निर्माण होतील. प्रकृती नाजूक राहील. चंद्र लाभ देणार असून कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न कमी होतील. संतती चिंतेत राहील. दिवस उत्तम. नामस्मरण करावे.
advertisement
तुला
शुक्र मंगळ लाभात नोकरी मध्ये संधी देईल..अध्यात्मिक बाबीत खर्च भरपूर होईल .घरात सुखसोयी मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक
दशमात मंगळशुक्र वृश्चिक व्यक्तीना नोकरी निमित्त प्रवास, बढती देईल. वडिलांची प्रकृती जपण्याचे संकेत देत आहे . प्रयत्न पूर्वक जागरूक रहा. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. विवाहसौख्य ,आर्थिक, धर्म कारण यासाठी उत्तम फळ देईल . ईश स्मरण करावे.
advertisement
धनू
गुरुकृपा आणि रवि बळ नोकरी व्यवसायात अडचणीतून मार्ग काढेल .पंचम गुरू व सप्तम चंद्र सामाजिक दर्जा,आर्थिक भरभराट देईल. प्रकृती ठीक राहील. संतती चिंता होईल. दिवस चांगला .
मकर
षष्ठ चंद्र आणि अष्टम मंगळ यांचा योग आहे त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक नुकसानीचे योग बनत आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास योग येतील .जोडीदारासोबत वेळ घालवाल. दिवस ठीक.
advertisement
कुंभ
शनी राशीमध्ये वक्री भ्रमण करीत आहे. कुंभ व्यक्ती आज ताण अनुभव करतील. चंद्र घरात जास्त जबाबदारी निर्माण करेल . प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . मुलांचे प्रश्न सुटतील. संतती , व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.
मीन
राशी स्वामी गुरु सध्या राहू सोबत असून परदेश गमन होईल. चंद्राच्या चतुर्थ स्थानातील उपस्थिती मुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल. दिवस मध्यम..
advertisement
शुभ भवतू!!
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल जाणून घ्या दैनंदिन राशी भविष्य
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement