हातात पैसा टिकत नाही? रात्री झोपण्यापूर्वी गुपचूप करा 'हे' एक काम, कधीच होणार नाही तिजोरी रिकामी!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जर कमाई असूनही आर्थिक अडचणी आणि अशांतता असेल, तर रात्रीचे काही ज्योतिष उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. ज्योतिषाचार्य ऋषिकांत मिश्र यांच्या मते...
बरेच लोक भरपूर कमाई करूनही त्यांच्या जीवनात अडचणी आणि समस्या कायम राहतात. अशा परिस्थितीत ते निराश होतात आणि या त्रासातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारचे तोडगे करतात. तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल, तर काही ज्योतिष उपाय करू शकता. विशेष म्हणजे, हे उपाय रात्रीच्या वेळी केल्यास ते अधिक प्रभावी ठरू शकतात.
हे चमत्कारिक उपाय केल्याने घरात केवळ सुख-शांतीच नाही, तर पैशांची चणचणही दूर होऊ शकते. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे उपाय करताना तुम्हाला कोणी पाहू नये किंवा त्याबद्दल विचारू नये. आता प्रश्न पडतो की धन-लाभाचे उपाय नेमके कोणते आहेत? पैशांची समस्या दूर करण्यासाठी काय करावे? याबद्दल उन्नावचे ज्योतिषाचार्य ऋषिकांत मिश्र यांनी माहिती दिली आहे.
advertisement
या उपायाने धन-धान्यात होईल वाढ
ज्योतिषाचार्यांच्या मते, संध्याकाळी माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करताना 5 गोमती चक्र नक्की घ्या. या गोमती चक्रांवर चंदन आणि केशराने 'महालक्ष्मी' असे नाव लिहा आणि त्यानंतर ती माता लक्ष्मीजवळ ठेवा. यानंतर विधीपूर्वक पूजा-अर्चा करा आणि लाल रंगाच्या कापडात ही गोमती चक्र बांधून घरातील धनाच्या ठिकाणी, जसे की कपाट किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने धन-धान्यात वाढ होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो.
advertisement
धन-लाभासाठी रात्री हे उपायही करा
दिवा लावा : ज्योतिषाचार्यांच्या मते, घरातील देव्हाऱ्यात रोज एक दिवा लावा. हा दिवा तूपाचा किंवा तेलाचा असू शकतो. असे नियमित केल्याने जीवनात धनप्राप्ती होण्यास मदत होते.
धनाच्या जागेवर कळवा बांधा : असे मानले जाते की ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात, तिथे कळवा (लाल-पिवळा धागा) बांधणे शुभ असते. असे केल्याने धनलाभाचा योग तयार होतो, अशी मान्यता आहे.
advertisement
झाडूखाली चांदीचे नाणे ठेवा : घराच्या झाडूखाली चांदीचे एक नाणे ठेवल्याने धनप्राप्ती होते आणि यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत होण्यास मदत होते.
तुळशीजवळ दिवा लावा : संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि लक्ष्मी प्रसन्न होते.
हळद आणि कवड्या : काही कवड्या घेऊन त्यांना हळदीचा टिळा लावा आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवा. कवड्यांचा संबंध थेट देवी लक्ष्मीशी मानला जातो आणि त्यांना तिजोरीत ठेवल्याने घरात पैशांची वाढ होते.
advertisement
हे ही वाचा : तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे? तर धारण करा 'हे' रत्न, दूर होतील अडचणी अन् राहू-केतूच्या त्रासातून व्हाल मुक्त!
हे ही वाचा : Shravan 2025: श्रावण पाळायचा म्हणजे फक्त मांसाहार सोडणं नव्हे; या गोष्टीही त्यासोबत टाळायला हव्या
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 11:11 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
हातात पैसा टिकत नाही? रात्री झोपण्यापूर्वी गुपचूप करा 'हे' एक काम, कधीच होणार नाही तिजोरी रिकामी!