Worlds Largest Shivling: जगातील सगळ्यात मोठं शिवलिंग स्थापनेसाठी तयार; हेलीकॉप्टरने होणार पुष्पवर्षा

Last Updated:

Worlds Largest Shivling : विराट रामायण मंदिर परिसरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग आज दाखल झाले. हे 33 फूट उंच आणि 210 टन वजनाचे असून एकाच अखंड ब्लॅक ग्रॅनाइट दगडातून हे 'सहस्त्रलिंगम' साकारले गेले आहे. तामिळनाडूतील महाबलीपुरम येथून हे शिवलिंग..

News18
News18
नवी दिल्ली : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील केसरिया येथे असलेल्या विराट रामायण मंदिर परिसरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग आज दाखल झाले. हे 33 फूट उंच आणि 210 टन वजनाचे असून एकाच अखंड ब्लॅक ग्रॅनाइट दगडातून हे 'सहस्त्रलिंगम' साकारले गेले आहे. तामिळनाडूतील महाबलीपुरम येथून हे शिवलिंग गोपाळगंज मार्गे येथे पोहोचले आहे. तामिळनाडूवरून विशेष ट्रेलरवर ठेवून आणलेल्या या विशाल शिवलिंगाचे गोपाळगंजमध्ये भाविकांनी भव्य स्वागत केले. तिथे विधिवत पूजा-अर्चा केल्यानंतर ते केसरियाकडे रवाना करण्यात आले. प्रवासादरम्यान जागोजागी भाविकांनी 'हर-हर महादेव'चा जयघोष केला.
शिवलिंगावर हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी -
17 जानेवारी रोजी विराट रामायण मंदिर परिसरात शिवलिंगाची पीठ पूजा, हवन आणि विधीपूर्वक स्थापना केली जाईल. या विशेष पूजेत कैलास मानसरोवर, हरिद्वार, सोनपूर, प्रयागराज आणि गंगोत्री येथील पवित्र जलाचा जलाभिषेकासाठी वापर केला जाईल. याशिवाय हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
advertisement
120 एकरमध्ये पसरलेला ड्रीम प्रोजेक्ट - पद्मश्री आचार्य किशोर कुणाल यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले विराट रामायण मंदिर 120 एकर परिसरात पसरलेले आहे. 2030 पर्यंत जेव्हा हे काम पूर्ण होईल, तेव्हा ते जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक ठरेल, ज्यामध्ये 18 मंदिरे आणि उंच मनोरे असतील. हे शिवलिंग मंदिराचे मुख्य आकर्षण असेल, ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
advertisement
याबाबत जिल्हाधिकारी सौरव जोरवाल यांनी सांगितले की, शिवलिंगाच्या आगमनानिमित्त विशेष तयारी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात येत आहे. पूर्व चंपारणच्या कथवलिया येथे विराट रामायण मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे. तिथे शिवलिंग स्थापित केले जाईल, ज्यासाठी प्रशासकीय स्तरावरही जय्यत तयारी सुरू आहे.
विराट रामायण मंदिराची काही खास वैशिष्ट्ये -
जगातील सर्वात मोठे मंदिर- हे मंदिर पूर्ण झाल्यावर कंबोडियातील प्रसिद्ध 'अंकोरवाट' मंदिरापेक्षाही मोठे असेल. अंकोरवाट मंदिराची उंची 215 फूट आहे, तर विराट रामायण मंदिराची उंची 270 फूट असेल.
advertisement
भव्य रचना - या मंदिराची लांबी 2800 फूट आणि रुंदी 1400 फूट आहे. मंदिरात एकूण 18 देवळे असतील, ज्यात प्रामुख्याने भगवान राम, माता सीता आणि भगवान शिव यांची मंदिरे असतील. येथे जगातील सर्वात मोठे शिवलिंग (सहस्त्रलिंगम) स्थापित केले जात आहे, ज्यावर एकाच वेळी 108 लहान शिवलिंगांची प्रतिकृती कोरलेली आहे. अष्टकोनी शिखर या मंदिराला 12 उंच शिखरे असतील, त्यापैकी मुख्य शिखर हे अतिशय भव्य आणि कलाकुसरीने नटलेले असेल. याची रचना दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय मंदिर स्थापत्यशैलीचा संगम असेल.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Worlds Largest Shivling: जगातील सगळ्यात मोठं शिवलिंग स्थापनेसाठी तयार; हेलीकॉप्टरने होणार पुष्पवर्षा
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement