हत्तीवर बसून मानकऱ्याची मिरवणूक, श्री रोकडेश्वर देवाची रात्री भरते यात्रा, साडेतीनशे वर्षांची परंपरा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून विविध परंपरा अखंडतरित्या सुरू आहेत. महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये यात्रा उत्सव हा अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असाच एक वेगळा यात्रा उत्सव सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या ऐतिहासिक गावात साजरा केला जातो.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून विविध परंपरा अखंडतरित्या सुरू आहेत. महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये यात्रा उत्सव हा अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असाच एक वेगळा यात्रा उत्सव सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या ऐतिहासिक गावात साजरा केला जातो. साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेली श्री रोकडेश्वर देवाची यात्रा कोजगिरी पौर्णिमेला मोठ्या थाटामाटात पार पडते. नेमकी काय आहे यामागे परंपरा? कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर रहिमतपूर गावामध्ये यात्रा का भरते? याबाबद्दलची अधिकची माहिती श्री रोकडेश्वर उत्सव समिती सदस्य बाळासाहेब गोरेगावकर यांनी दिली आहे.
advertisement
यात्रा नेमकी कधी सुरू झाली?
साडेतीनशे वर्षांपूर्वी या यात्रेचा प्रारंभ झाला. रहिमतपूर येथे श्रीमंत रोकडेश्वर देवाचे यात्रा ही कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी सात वाजता सुरू होते आणि पाहटे सात पर्यंत चालते. यावेळी स्त्री रोकडेश्वर मंदिराला आकर्षक अशी पुष्प सजावट केली जाते. श्री रोकडेश्वर महाराजांची विविध आभूषणे विभूषित अशी राजेशाही थाटात सुंदर पूजेनंतर पालखी बांधली जाते. संध्याकाळी सात वाजता श्री रोकडेश्वर महाराजांचा उत्सव खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
advertisement
या उत्सवात केरळ येथील दक्षिणात्य वाद्य पथक खिद्रापूर जिल्हा, कोल्हापूर येथील लक्ष्मी वाद्य पथक, माण तालुक्यातील सनई डफडी वाद्य पथक, श्री ज्योतिबा मर्दानी खेळ पथक, धनगरी गजी पथक, सबळ वाद्य पथक नाशिक, बाजा हलगी पथक पुसेसावळी येथील शाहीर हेबती भेदकी पार्टी, भारुड सिंग वादक तसेच इतर विविध संस्कृतिक आणि वाद्यपदकांची कला या श्री रोकडेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पाहायला मिळतात.
advertisement
रोकडेश्वर मंदिरातून वाचत गाजत रणसिंगाच्या निनादात भालदार चोपदाराच्या गगनभेदी ललकारीत गजराजाला घेऊन श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सवाचे मानकरी सरदार रवींद्र माने पाटील यांना आणण्यासाठी त्यांच्या वाड्याकडे प्रयाण करतात. श्रींची स्वारी ग्राम प्रदक्षिणेला निघते त्यावेळी हत्ती वर बसून मानकरी श्री रोकडेश्वर मंदिर येथे येतात. पालखीवर गुलाबाची उधळण केल्यानंतर पालखी सोहळ्यात सुरुवात झाली असे समजले जाते. श्रींची पालखी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर श्रींना गजराज चांदीच्या चवारीने मानवंदना करतो आणि पालखी सोहळ्यात सुरुवात होते अग्रभागी विविध कलापथक वाद्यपथक त्यानंतर गजराज आणि श्री रोकडेश्वर करंड ढोल भजनी मंडळ असते. त्याचबरोबर गवळणी अभंग इतर संतांच्या अभंग पदपालखी समोर गायली जातात आणि मोठ्या उत्साहात यात्रा पार पडते.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
October 17, 2024 7:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
हत्तीवर बसून मानकऱ्याची मिरवणूक, श्री रोकडेश्वर देवाची रात्री भरते यात्रा, साडेतीनशे वर्षांची परंपरा