IND vs ENG : शुभमनची गरज नाही आता रोहितची रिप्लेसमेंट मिळाली; इंग्लंडविरुद्ध अखेर 'कॅप्टन'ची बॅट तळपली, KL ची जागा धोक्यात!

Last Updated:

India vs England Test : गेल्या सामन्यात अभिमन्यूची (Abhimanyu Easwaran) बॅट शांत होती, पण दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अभिमन्यू 13 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधाराच्या बॅटमधून धावा आल्या.

Abhimanyu Easwaran brilliant knock In India A vs england lions
Abhimanyu Easwaran brilliant knock In India A vs england lions
Abhimanyu Easwaran : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 20 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होईल आणि 4 ऑगस्टपर्यंत चालेल. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी पोहोचला आहे. याआधी इंडिया ए संघ इंग्लंड लायन्ससोबत सराव सामना खेळत आहे, ज्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन अभिमन्यू इश्वरनची बॅट तळपल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता केएल राहुलची जागा देखील धोक्यात आली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

अभिमन्यूची बॅट तळपली

गेल्या सामन्यात अभिमन्यूची बॅट शांत होती, परंतु दुसऱ्या सामन्यात संघाच्या कर्णधाराने अर्धशतक झळकावून शानदार खेळी केली. अभिमन्यू ईश्वरनला इंडिया ए संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अभिमन्यू 13 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधाराच्या बॅटमधून धावा आल्या. दुसऱ्या डावात अभिमन्यू ईश्वरनने 92 चेंडूत 80 धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. फक्त काही धावांनी त्याचं शतक हुकलं. पण त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो.
advertisement

रोहितचा वासरदार ठरला

पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करताना अभिमन्यूने केएल राहुलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. अभिमन्यूला यापूर्वीही भारतीय कसोटी संघात संधी देण्यात आली होती, परंतु त्याला शेवटच्या 11 मध्ये संधी मिळाली नाही. तथापि, रोहितच्या निवृत्तीनंतर यावेळी अभिमन्यूचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण निश्चित दिसते. अभिमन्यूने 102 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7750 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 27 शतके केली आहेत, तर 30 अर्धशतकेही त्याच्या बॅटमधून आली आहेत.
advertisement

ओपनिंगला कोण?

करुण नायरने इंडिया ए संघाच्या सराव सामन्यात शानदार कामगिरी केली आणि द्विशतक झळकावले. याआधी करुणने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे करुण नायर सलामीवीर म्हणून पर्याय असू शकतो. तसेच दुसरीकडे केएल राहुलने देखील शतक ठोकून दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता इश्वरनला संधी मिळणार का, हे पहावं लागेल.
advertisement

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया :

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईसवरन, मोहम्मद जयस्वार, मोहम्मद जयस्वार, बी.एस. प्रसिध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : शुभमनची गरज नाही आता रोहितची रिप्लेसमेंट मिळाली; इंग्लंडविरुद्ध अखेर 'कॅप्टन'ची बॅट तळपली, KL ची जागा धोक्यात!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement