Ranji Trophy : 24 वर्षांच्या पोराने इतिहास घडवला, विराट-सचिनही राहिले मागे, रणजीमध्ये नवा पराक्रम!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
रणजी ट्रॉफीच्या 2025-26 मोसमाच्या पहिल्याच सामन्यात 24 वर्षांच्या पोराने इतिहास घडवला आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
मुंबई : रणजी ट्रॉफीच्या 2025-26 मोसमाच्या पहिल्याच सामन्यात 24 वर्षांच्या पोराने इतिहास घडवला आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. 24 वर्षांचा गोव्याचा बॅटर अभिनव तेजराणाने चंडीगडविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला आहे. अभिनव तेजराणाने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यामध्येच द्विशतक झळकावलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या अभिनवने त्याच्या द्विशतकी खेळीमध्ये 21 फोर आणि 4 सिक्स मारले.
अर्जुनचे क्लबमध्ये अभिवनला स्थान
अभिनव तेजराणाने पदार्पणातच शतक झळकावून गोव्याच्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासात नवा विक्रम केला. गोव्याकडून पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला, याआधी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 2022 साली राजस्थानविरुद्ध 120 रनची खेळी केली होती. पहिल्या दिवशी अभिनव 130 रनवर खेळत होता, यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी आणखी 70 रन केल्या आणि 301 बॉलमध्ये विक्रमी द्विशतक केलं.
advertisement
गुंडप्पा विश्वनाथच्या यादीत एन्ट्री
अभिनव तेजराणा पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक करणारा गोव्याचा पहिलाच आणि रणजी ट्रॉफीच्या इतिहासामधील 13वा खेळाडू ठरला आहे. महान क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ आणि अमोल मुझुमदार यांनीही त्यांच्या पदार्पणाच्या रणजी सामन्यात द्विशतक ठोकलं होतं. या यादीत अंशुमन पांडे, मनप्रीत जुनेजा, जीवनजोत सिंग, अभिषेक गुप्ता, अजय रोहेरा, मयंक राघव, अर्सलान खान, साकिबुल गनी, पवन शाह आणि सुवेद पारकर या खेळाडूंचा समावेश आहे.
advertisement
विशू कश्यपने घेतल्या 7 विकेट
या सामन्यात गोव्याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर गोव्याची पहिली विकेट स्वस्तात गेली. मग सुयश प्रभूदेसाईला साथ द्यायला अभिनव तेजराणा आला, पण दुसऱ्या बाजूने विकेट पडतच होत्या. अभिनवच्या द्विशतकाशिवाय सुयश प्रभुदेसाईने 47 रन केल्या. अर्जुन तेंडुलकर या सामन्यात फक्त 1 रन करून आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये गोव्याचा 566 रनवर ऑलआउट झाला. चंदीगडच्या विशू कश्यपने 7 विकेट घेतल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 8:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : 24 वर्षांच्या पोराने इतिहास घडवला, विराट-सचिनही राहिले मागे, रणजीमध्ये नवा पराक्रम!