AFG vs BAN : वनडेमध्ये तब्बल 200 धावांनी बांगलादेशला लोळवलं, आऊट झाल्यावर 213 धावा करणाऱ्या हिरोने घातला राडा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Afghanistan vs Bangladesh : अफगाणिस्तानच्या विजयात इब्राहिम झद्रानने महत्त्वाची भूमिका बजावली. इब्राहिम झद्रान याने 95 धावांची आक्रमक खेळ केली.
Ibrahim zadran frustration Video : अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या रोमांचक वनडे मालिकेत अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवला असून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानने बांगलादेशला 3-0 ने क्लिन स्वीप दिला आहे. 14 ऑक्टोबर रोजी अबूधाबी येथे अखेरचा वनडे सामना खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 200 धावांनी विजय मिळवला आहे.एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत हा अफगाणिस्तानचा दुसरा सर्वात मोठा विजय होता.
संताप अनावर झाला अन् डगआऊटमध्ये राडा
अफगाणिस्तानने याआधी, डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी झिम्बाब्वेचा 234 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानने वनडे क्रिकेटमधील दुसरा मोठा विजय नोंदवला आहे. या विजयात इब्राहिम झद्रानने महत्त्वाची भूमिका बजावली. इब्राहिम झद्रान याने 95 धावांची आक्रमक खेळ केली. इब्राहिम झद्रान याचं 5 धावांनी शतक हुकलं. विशेष म्हणजे दोनदा त्याला 95 धावांवर आऊट व्हावं लागलं आहे. रनआऊट झाल्याने इब्राहिम झद्रान याला संताप अनावर झाला अन् डगआऊटमध्ये पोहोचताच त्याने बॅट आदळली.
advertisement
दोनदा फक्त 5 धावां शतक हुकलं
इब्राहिम झद्रान याने मालिकेत एकट्याने 213 धावा केल्या, तीन सामन्यांमध्ये 71 च्या सरासरीने 14 फोर आणि 3 सिक्स मारले. झद्रान मालिकेत दोनदा शतक हुकलंय. ते पण फक्त 5 धावांनी... अफगाणिस्तानकडून बिलाल शमी याने पाच विकेट्स नावावर केल्या. तर राशीद खाने फक्त 12 रन देऊन तीन महत्त्वाच्या विकेट काढल्या. त्यामुळे बांगलादेशचा संघ फक्त 93 धावा करू शकला.
advertisement
Ibrahim zadran Reaction After missing his well deserved hundred. pic.twitter.com/oHO04qA69X
— ACB Xtra (@acb_190) October 14, 2025
बांगलादेशला क्लीन स्वीप
दरम्यान, अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली आहे. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी क्लीन स्वीप मिळवला आहे. 14 ऑक्टोबर रोजी अबूधाबी येथे खेळला गेलेला शेवटचा सामना जिंकताच अफगाणिस्तानने मालिकेत बांगलादेशचा खेळ खल्लास केला. अशातच आता अफगाणिस्तानचं वर्ल्ड क्रिकेटमध्ये वजन वाढल्याचं पहायला मिळतंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AFG vs BAN : वनडेमध्ये तब्बल 200 धावांनी बांगलादेशला लोळवलं, आऊट झाल्यावर 213 धावा करणाऱ्या हिरोने घातला राडा!