MI vs PBKS : लीडर असावा तर असा…! हार्दिक खचून गेला पण अपूरं काम बुमराहने केलं, जस्सीने काळीज जिंकलं

Last Updated:

MI vs PBKS : रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्सचा क्वालिफायर 2 चा सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबने बाजी मारली आणि अंतिम सामन्यात स्थान पक्कं केलं तर मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ चा प्रवास इथेच संपला. या सामान्य दरम्यान असं काही घडलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं.

News18
News18
MI vs PBKS Qualifier 2 : रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्सचा क्वालिफायर 2 चा सामना खेळला गेला. पावसामुळे या सामन्यात अडथळा आला खरा पण या सामन्यातील रोमांच शेवटपर्यंत कायम होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यात रोमांच टिकून होता कारण खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पंजाब किंग्सने 11 वर्षांनंतर अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे तर मुंबई इंडियन्सचा आयपीएलचा प्रवास कटू आठवणींसह संपला.
मुंबई इंडियन्सचा आयपीएलचा प्रवास संपला
रविवारी, 1 जूनला मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जचा अटीतटीचा सामना खेळला गेला या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पावसाच्या मोडत्यानंतरही हा सामना निर्धारित 20 ओव्हर्सचा सामना खेळला गेला. या निर्धारित 20 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 203 धावांचा डोंगर पंजाब समोर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने हे लक्ष भेदले आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. या सामन्यात अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे चाहत्यांनी श्वास धरून ठेवला पण अखेर खेळाचा भागच आहे कोणाचा विजय तर कोणाचा पराभव. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाचा प्रवास संपला.
advertisement
एकीकडे सेलिब्रेशन दुसरीकडे बुमराहने जिंकलं मन
मुंबई इंडियन्सने जिंकलेला सामना कसा हरला? मुंबई इंडियन्सने सुरवातीच्या ओव्हर्समध्ये अनेक रन्स दिले. जसप्रीत बुमराहची पाचवी ओव्हर मुंबईसाठी घातक ठरली. या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या ओव्हरला जोश इंग्लिशने 20 रन्स पटकावले. तर शेवटची ओव्हर मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट स्वप्न ठरली. अश्वनी कुमारने शेवटची ओव्हर टाकली. नवख्या अश्वनी कुमारला पंजाबच्या कर्णधाराने न जुमानता 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारले आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के करत मुंबईच्या आयपीएलच्या या प्रवासाला फुलस्टॉप लावला. पंजाबने सामना जिंकताच सर्वत्र उत्सवाचं वातावरण पाहायला मिळाल. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह चाहत्यांमध्येही निराशा पाहायला मिळाली. पण या दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली. एकीकडे सर्व पंजाबचा विजय साजरा करत असताना. अश्वनी कुमार ज्याच्या ओव्हरमध्ये पंजाबने हा सामना जिंकला त्याची निराशा उघड दिसत होती अश्या वेळी दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराहने त्याचे सांत्वन केल्याचे दिसून आले.
advertisement
advertisement
पंजाबचं मुंबईवर वर्चस्व
गोलंदाजीचा निर्णय घेत पंजाबने डावाला सुरवात केली आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या क्षेत्ररक्षणात चुका नजर आल्या. पहिल्या डावात म्हणजे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीत मुंबईने 6 विकेट गमावत 203 धावा केल्या. पंजाब समोर 203 धावांचा लक्ष ठेवल्या नंतर पंजाबनेही त्यांचं कौशल दाखवत मुंबईवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. सुरुवातीला पंजाबने देखील काही विकेट्स गमावल्या आणि तेव्हा सामना हातातून निसटलं असे वाटत असताना श्रेयसने डाव सावरला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs PBKS : लीडर असावा तर असा…! हार्दिक खचून गेला पण अपूरं काम बुमराहने केलं, जस्सीने काळीज जिंकलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement