IPL 2025 : 'काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही...', KKR च्या पराभवानंतर श्रेयस अन् रहाणे यांच्यातील मराठी संभाषणाचा व्हिडीओ लीक
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas and Rahane Viral Video : सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एका रांगेत उभे राहून एकमेकांशी हस्तांदोलन करत होते तेव्हा श्रेयस आणि अजिंक्यमध्ये काय बोलणं झालं? पाहा
KKR vs PBKS : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर धमाकेदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जचा संघ 15.3 षटकांत फक्त 111 धावांवर गारद झाला. यानंतर, संपूर्ण केकेआर संघही 15.1 षटकांत केवळ 95 धावांवर सर्वबाद झाला. केकेआर संघाला आयपीएल इतिहासातील लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्यावर टीका होताना दिसतीये. अशातच आता श्रेयस अन् रहाणेच्या संभाषणाचा व्हिडीओ लीक झाला आहे.
नेमकं काय घडलं?
सामना संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एका रांगेत उभे राहून एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा रहाणेने विरोधी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला पाहिलं. दोघंही मुंबईचे असल्याने दोघांची मैत्री घट्ट होती. रहाणेने यावेळी अय्यरला बोलण्याचा प्रयत्न केला, रहाणे मराठीत श्रेयसला म्हटलं, 'काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही'...' यावेळी रहाणेने हसण्याचा खूप प्रयत्न केला पण पराभवाचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यावर अय्यरने देखील अजिंक्यला हसून उत्तर दिलं.
advertisement
Was watching the #PBKSvKKR game and caught this funny bit as Shreyas and Rahane shook hands at the end. In a self-deprecating way Rahane appears to be saying to Shreyas in Marathi : काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही (We played terrible, didn't we) 😂😂 pic.twitter.com/bNkC7TXGbU
— निखिल घाणेकर (Nikhil Ghanekar) (@NGhanekar) April 15, 2025
advertisement
अजिंक्य रहाणे म्हणाला....
स्पष्टीकरण देण्यासारखं काहीही उरलेलं नाही, तिथे काय घडले ते आपण सर्वांनी पाहिलंय. प्रयत्नांमुळे खूप निराश झालो. मी पराभवाची जबाबदारी घेईन, चुकीचा शॉट खेळला, असं म्हणत रहाणेने स्वत:ला दोषी ठरवलं. मात्र, अंगक्रिश देखील चुकला. मला फारशी खात्री नव्हती. अंगक्रिश म्हणाला की हा पंचांचा निर्णय असू शकतो. मला त्यावेळी कोणताही धोका पत्करायचा नव्हता, असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
advertisement
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॉन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) : क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, ॲनरिक नोरखिया, वरुण चक्रवर्ती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 16, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : 'काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही...', KKR च्या पराभवानंतर श्रेयस अन् रहाणे यांच्यातील मराठी संभाषणाचा व्हिडीओ लीक