Vaibhav Suryavanshi ला तातडीने सिनियर टीममध्ये खेळवा, अजित आगरकर यांच्याकडे कुणी केली मागणी? सचिन तेंडूलकरने देखील...

Last Updated:

Vaibhav Suryavanshi In Team India : बारुचांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "जसं अनेक वर्षांपूर्वी सचिनला सिनियर टीममध्ये घेण्यात आलं होतं, तसंच या मुलालाही सिनियर टीममध्ये लगेच समाविष्ट करावं."

Vaibhav Suryavanshi In Team India
Vaibhav Suryavanshi In Team India
Vaibhav Suryavanshi In Team India : राजस्थान रॉयल्सचा स्टार युवा खेळाडू वैभव सुर्यवंशी याने पहिल्याच आयपीएल हंगामात शतक ठोकून सर्वांना चकित केलं होतं. 14 वर्षाच्या या पोराने आता अंडर-19 मध्ये देखील आपला जलवा दाखवला आहे. अशातच आता वैभव सुर्यवंशीला थेट टीम इंडियामध्ये खेळवण्याची मागणी केली जात आहे. राजस्थान रॉयल्सचे डायरेक्टर ऑफ हाय परफॉर्मन्स जुबिन बारुचा यांनी बीसीसीआयचे (BCCI) मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर यांना वैभव सूर्यवंशीच्या निवडीबद्दल गांभिर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. त्यावेळी त्यांनी वैभवचा किस्सा देखील सांगितला.

सचिनला अगदी लहान वयातच ओळखलं होतं

बिहारचा लेफ्ट हँडेड बॅटर वैभव सुर्यवंशी देशासाठी काहीतरी खास करू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे उदाहरण दिलं की, कसं सिलेक्टर्सनी सचिनला अगदी लहान वयातच ओळखलं होतं. बारुचांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "जसं अनेक वर्षांपूर्वी सचिनला सिनियर टीममध्ये घेण्यात आलं होतं, तसंच या मुलालाही सिनियर टीममध्ये लगेच समाविष्ट करावं."
advertisement

जोफ्रा आर्चरला नेट्समध्ये धुतलं

वैभवला लगेच टीममध्ये घ्यायला हवं, कारण तो एका वेगळ्याच झोनमध्ये आहे. त्याला कमीतकमी इंडिया ए दौऱ्यावर तरी पाठवा. मी तुम्हाला सांगतो, सध्या इंडिया ए सोबत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंग अटॅकसमोर त्याने दुहेरी सेंच्युरी केली असती. त्याने जोफ्रा आर्चरला नेट्समध्ये धुतले. जोफ्रा आर्चर जेव्हा नेट्समध्ये बॉलिंग करतो, तेव्हा तो एका राक्षसासारखा असतो. तो बॅटरला कधीही वॉर्म-अप बॉल टाकत नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
advertisement

बॅक फुटवर एक शॉट मारला अन्...

जोफ्रा आर्चर पूर्ण पॉवरने (power) बॉलिंग करतो. ॲशेस (Ashes) आधीच्या एका प्रॅक्टिस सेशनमध्ये जोफ्रा आर्चरने स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला बॉल लागला होता. स्मिथला त्याच्यासमोर खेळणं जड जात होतं. त्या दिवसापासून जोफ्रा बॉलिंग करत असताना तो नेटच्या आत कधीच गेला नाही. वैभवला तो बॉलिंग करत असताना मला भीती वाटत होती आणि या मुलाने बॅक फुटवर एक शॉट मारला, जो थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. सर्व कोचिंग स्टाफ, जोफ्रासुद्धा आश्चर्यचकित झाले होते, असं जुबिन बारुचा यांनी सांगितलं.
advertisement

वैभवला टीम इंडियामध्ये संधी मिळणार?

दरम्यान, मास्टर ब्लास्टरने 1989 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध डेब्यू (debut) केला होता. सध्या 14 वर्षांचा असलेला सूर्यवंशी सध्या अंडर-19 टीमकडून खेळत असून, त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही केला आहे, पण त्याला अजून इंडिया ए टीममध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे वैभवला आता संधी कधी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi ला तातडीने सिनियर टीममध्ये खेळवा, अजित आगरकर यांच्याकडे कुणी केली मागणी? सचिन तेंडूलकरने देखील...
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement