IND vs ENG : जडेजामुळे Washington Sundar चं वाढणार टेंशन, टेस्ट सिरीजमधून होणार पत्ता कट? शेवटच्या क्षणी…
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची एक रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार असून या मालिकेसाठी अजूनही भारताच्या अधिकृत प्लेइंग 11 संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची एक रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार असून या मालिकेसाठी अजूनही भारताच्या अधिकृत प्लेइंग 11 संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. अश्यातच हा तरुण संघ पहिल्यांदाच परदेशात दिग्गज खेळाडूंसह सामना करणार आहे. अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारताच्या कसोटी संघाची कमान सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.
या मालिकेपूर्वी, भारताचा अ संघ इंग्लंडमध्ये अनऑफिशिअल सामने खेळला आणि या संघात 20 जूनपासून सुरु होणाऱ्या अधिकृत कसोटी मालिकेत निवड झालेल्या खेळाडूंनीही सराव केल्या अश्या परिस्थिती आता हे पाहणे महत्वाचे असेल की अधिकृत सामन्यांमध्ये नेमकं कोणाला स्थान मिळते. तत्पूर्वी, आता अनेक खेळाडूंना कदाचित संघाबाहेर बसावं लागण्याची शक्यता आहे. हे खेळाडू नेमके कोण असणार हे सांगणे थोडे कठीण आहे. प्रत्येक खेळाडू उत्तम कामगिरी करत असून संघात मिळवण्यासाठी धडपड करत आहे. अश्यातच नितीश कुमार रेड्डीनंतर आणखी एका खेळाडूच्या अधिकृत सामन्यात खेळण्यावर शंका उपस्थित केली जात आहे.
advertisement
इंग्लंड दौऱ्यावर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळणार नाही
25 वर्षीय वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंड दौऱ्यावर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी मिळणार नाही. याचे कारण म्हणजे भारतीय व्यवस्थापन त्याच्याऐवजी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला प्राधान्य देऊ शकते. कुलदीप यादवला दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. तथापि, इंग्लंडमध्ये संघ क्वचितच दोन फिरकी गोलंदाजांसह खेळवले जातात. बहुतेक संघ फक्त एकाच फिरकी गोलंदाजासह खेळतात. अशा परिस्थितीत सुंदरला संधी मिळणे कठीण आहे. जर पहिल्या काही सामन्यांमध्ये जडेजा चांगली कामगिरी करू शकला नाही, तर कदाचित वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये भारतासाठी 12 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 642 धावा केल्या आहेत.
advertisement
वॉशिंग्टन सुंदर कारकीर्द
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत भारतासाठी 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 4 अर्धशतकांसह 468 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटी सामन्यात 25 बळीही घेतले आहेत. सुंदरने इंग्लंडमध्ये एकही कसोटी सामना खेळलेला नाही. सुंदरने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2025 12:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : जडेजामुळे Washington Sundar चं वाढणार टेंशन, टेस्ट सिरीजमधून होणार पत्ता कट? शेवटच्या क्षणी…