Arijit Singh : अरिजितने गाणं सोडलं, पण स्मृती मानधनाला दिली आयुष्यभराची आठवण, इमोशनल Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
कोट्यवधी भारतीयांनी ज्या आवाजावर प्रेम केलं, त्या अरिजित सिंगने गाण्यातून निवृत्तीची घोषणा केली आहे. अरिजितने सोशल मीडियावर पोस्ट करून आपण आता प्ले बॅक सिंगिग करणार नाही, असं जाहीर करून टाकलं.
मुंबई : कोट्यवधी भारतीयांनी ज्या आवाजावर प्रेम केलं, त्या अरिजित सिंगने गाण्यातून निवृत्तीची घोषणा केली आहे. अरिजितने सोशल मीडियावर पोस्ट करून आपण आता प्ले बॅक सिंगिग करणार नाही, असं जाहीर करून टाकलं आहे, त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. अरिजितने टीम इंडियाची दिग्गज क्रिकेटपटू स्मृती मानधना हिला आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण दिली आहे.
कौन बनेगा करोडपतीच्या 9 व्या सिझनमध्ये टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटू आल्या होत्या. शो मध्ये अमिताभ बच्चन यांनी मिताली राज आणि तिच्या संपूर्ण टीमचं स्वागत केलं. शोमध्ये टी-20 थीम स्वीकारली गेली, ज्यात मिताली राज स्मृती मानधना आणि पूनम राऊत यांनी खेळाची सुरूवात केली.
स्मृती आणि पूनम काही काळ खेळ चालू ठेवतात, त्यानंतर मिताली आणि वेदा कृष्णमूर्ती जबाबदारी घेतात. त्यांनी मिळून टीमला 40 हजार रुपये कमावण्यास मदत केली. यानंतर झुलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौर बिग बींसोबत खेळण्यासाठी आल्या, या दोघींनी 3.2 लाखांपर्यंत रक्कम जिंकली. त्याचवेळी अमिताभ बच्चन स्मृती मानधनाला स्टेजवर बोलावलं आणि अचानक अरिजित सिंगला फोन केला.
advertisement
केबीसी शो सुरू असतानाच स्मृती अरिजित सिंगसोबत बोलली आणि मला तुझं चन्ना मेरेया गाणं आवडतं असं सांगितलं. यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्मृतीसाठी चन्ना मेरेया गाणं म्हण अशी विनंती केली. बिग बींच्या या विनंतीला अरिजित सिंगने मान दिला आणि गाण्याच्या दोन ओळी म्हटल्या.
advertisement
अरिजित सिंगने गायकीतून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याने स्मृती मानधनासाठी म्हटलेलं चन्ना मेरेया हे गाणं सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये आलं आहे. दरम्यान 2017 च्या केबीसीच्या त्या भागामध्ये बारतीय महिला टीम 6.4 लाख रुपये जिंकली होती. भारतीय टीमने जिंकलेले हे पैसे हैदराबादमधील प्रयास नावाच्या संस्थेला दान केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 11:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arijit Singh : अरिजितने गाणं सोडलं, पण स्मृती मानधनाला दिली आयुष्यभराची आठवण, इमोशनल Video










