Team India : 'माझा रोहित शर्मा झाला', टॉसवेळी प्लेयिंग इलेव्हन विसरला सूर्या, SKY चा गजनी Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये टीम इंडिया ओमानविरुद्ध ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
मुंबई : आशिया कपमध्ये टीम इंडिया ओमानविरुद्ध ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण टॉसवेळी सूर्यकुमार यादव टीम इंडियाची प्लेयिंग इलेव्हनच विसरला. रवी शास्त्रींनी टीम विचारल्यानंतर सूर्याने टीममध्ये 2 बदल केल्याचं सांगितलं. हर्षीत राणाचं कमबॅक झाल्याचं सूर्या म्हणाला, पण दुसऱ्या खेळाडूचं नाव तो विसरला. माझा रोहित शर्मा झाल्याचंही सूर्यकुमार यादव टॉसवेळी म्हणाला.
टीम इंडियामध्ये दोन बदल
या सामन्यात टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांऐवजी अर्शदीप सिंग आणि हर्षीत राणा यांना संधी मिळाली आहे. टीम इंडियाने सुपर-4 मध्ये आधीच प्रवेश केला आहे, त्यामुळे हा सामना भारतासाठी सुपर-4 राऊंड आधीचा सराव म्हणून पाहिला जात आहे. सूर्यकुमार यादवनेही टॉसवेळी हेच सांगितलं. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आम्ही पहिले बॉलिंग केली, त्यामुळे आता बॅटिंग कशी होत आहे, हे पाहण्याची संधी असल्याचं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
टीम इंडियाची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षीत राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
टीम इंडिया सुपर-4 मध्ये
टीम इंडिया ग्रुप स्टेजमधली शेवटची मॅच आज खेळत असली, तरी सुपर-4 च्या चारही टीम आधीच निश्चित झाल्या आहेत. ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान तर ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश सुपर-4 मध्ये पोहोचले आहेत. सुपर-4 मध्ये या चारही टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. सुपर-4 नंतर सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या 2 टीम आशिया कपची फायनल खेळतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 7:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 'माझा रोहित शर्मा झाला', टॉसवेळी प्लेयिंग इलेव्हन विसरला सूर्या, SKY चा गजनी Video