हार्दिक पांड्या नाही तर... आशिया कपसाठी 25 वर्षांचा खेळाडू होणार टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन!

Last Updated:

गुजरात टायटन्सला पहिल्याच मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्यानंतर हार्दिक पांड्या टीम इंडियाचा टी-20 चा पुढचा कर्णधार होईल, असं बोललं जात होतं.

हार्दिक पांड्या नाही तर... आशिया कपसाठी 25 वर्षांचा खेळाडू होणार टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन!
हार्दिक पांड्या नाही तर... आशिया कपसाठी 25 वर्षांचा खेळाडू होणार टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन!
मुंबई : गुजरात टायटन्सला पहिल्याच मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्यानंतर हार्दिक पांड्या टीम इंडियाचा टी-20 चा पुढचा कर्णधार होईल, असं बोललं जात होतं. रोहित शर्माच्या गैरहजेरीमध्ये हार्दिक पांड्याने भारताच्या टी-20 टीमचं नेतृत्वही केलं, पण रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-20 टीमचं कर्णधार केलं गेलं. यानंतर आता आशिया कपसाठी टीम इंडियाला नवा उपकर्णधार मिळण्याची शक्यता आहे.
इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये शुभमन गिलने त्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतरही गिलच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज 2-2 ने ड्रॉ केली, यानंतर आता शुभमन गिलला टी-20 टीममध्येही महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे.
रेव्हस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार आशिया कपसाठी शुभमन गिलचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन होणार आहे. एवढच नाही तर त्याला टी-20 टीमचं उपकर्णधारही करण्यात येणार आहे. गिल टी-20 टीममध्ये पुनरागमन करणार असल्यामुळे तो या फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्याची शक्यता आहे. कारण ओपनिंगला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
advertisement
आयपीएल 2025 मध्येही शुभमन गिलने धमाका केला होता. गुजरात टायटन्सकडून खेळताना शुभमन गिलने 157.80 च्या स्ट्राईक रेटने 890 रन केले. तर त्याआधीच्या आयपीएलमध्ये गिलने 147.40 च्या स्ट्राईक रेटने 426 आणि 155.88 च्या स्ट्राईक रेटने 650 रन केले. मागच्या 3 आयपीएलमधल्या या सातत्यपूर्ण कामगिरीचं फळ गिलला मिळण्याची शक्यता आहे.

वनडे टीमचा कर्णधार?

advertisement
टेस्ट क्रिकेटनंतर वनडे क्रिकेटमध्येही गिलला टीम इंडियाचं नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर तो 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करू शकतो. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबर महिन्यात होणारी वनडे सीरिज विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी अखेरची ठरू शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हार्दिक पांड्या नाही तर... आशिया कपसाठी 25 वर्षांचा खेळाडू होणार टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement