आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर, सूर्याच्या अडचणी वाढल्या!

Last Updated:

इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजनंतर आता टीम इंडियाचे खेळाडू एक महिना विश्रांती घेणार आहे. टीम इंडिया आता सप्टेंबर महिन्यात आशिया कपमध्ये खेळणार आहे, पण त्याआधीच टीमला मोठा धक्का लागला आहे.

आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर, सूर्याच्या अडचणी वाढल्या!
आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर, सूर्याच्या अडचणी वाढल्या!
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजनंतर आता टीम इंडियाचे खेळाडू एक महिना विश्रांती घेणार आहे. टीम इंडिया आता सप्टेंबर महिन्यात आशिया कपमध्ये खेळणार आहे, पण त्याआधीच टीमला मोठा धक्का लागला आहे. स्टार खेळाडू ऋषभ पंत आशिया कपमधून बाहेर झाला आहे, तसंच वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्येही पंतच्या खेळण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये रिव्हर्स स्वीप मारताना क्रिस वोक्सने टाकलेला बॉल पंतच्या पायाला लागला होता, यानंतर पंतचा पाय फ्रॅक्चर झाला. पायाला दुखापत झालेली असतानाही पंतने चौथ्या टेस्टमध्ये बॅटिंग केली, पण पाचव्या टेस्टमध्ये तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
पायाला दुखापत झाल्यामुळे पंत कमीत कमी 6 आठवडे खेळू शकणार नाही, असं वृत्त सुरूवातीला समोर आलं होतं. पण टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ऋषभ पंत आशिया कपसाठी फिट होणार नाही, तसंच वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही पंतच्या खेळण्याची शक्यता कमी आहे.
ऋषभ पंतला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये ध्रुव जुरेल खेळला होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठीही पंत फिट झाला नाही तर ध्रुव जुरेल यालाच विकेट कीपिंगची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध आणि 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होईल. यानंतर 18 सप्टेंबरला भारत ओमानविरुद्ध ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळेल. आशिया कपमध्ये ऋषभ पंतऐवजी संजू सॅमसन आणि इशान किशन या दोन विकेट कीपरची नावं आघाडीवर आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर, सूर्याच्या अडचणी वाढल्या!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement