Asia Cup : 6,0,6,6,4,6... एका ओव्हरमध्ये ठोकल्या 28 रन, मुंबई इंडियन्सच्या बॉलरला बांगलादेशने बेक्कार चोपलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप रायजिंग स्टारच्या सेमी फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 194 रन केल्या आहेत.
दोहा : आशिया कप रायजिंग स्टारच्या सेमी फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 194 रन केल्या आहेत. दोहामध्ये इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्यात आशिया कपची सेमी फायनल होत आहे. या सामन्यात इंडिया ए चा कर्णधार जितेश शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर इंडिया ए च्या बॉलरनी 17व्या ओव्हरपर्यंत बांगलादेशला रोखलं, पण त्यानंतर त्यांनी आक्रमक बॅटिंग केली.
इनिंगच्या 19व्या ओव्हरला एसएम मेहरूबने नमन धीरला तब्बल 28 रन ठोकल्या, ज्यात 4 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा नमन धीर हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. आयपीएलच्या मागच्या मोसमात नमन धीरने मुंबईसाठी फिनिशरची महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बांगलादेशकडून एसएम मेहरूबने 18 बॉलमध्ये 266.67 च्या स्ट्राईक रेटने 48 रन केल्या, यात 6 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. मेहरूबशिवाय ओपनर हबिबुर रहमान सोहन याने 46 बॉलमध्ये 65 रनची खेळी केली, यात त्याने 3 फोर आणि 5 सिक्स मारल्या. भारताकडून गुरजापनीत सिंग याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, याशिवाय हर्ष दुबे, सुयश शर्मा, रमणदीप सिंग आणि नमन धीर यांना एक-एक विकेट मिळाली.
advertisement
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल ती आशिया कप रायजिंग स्टारच्या फायनलमध्ये पोहोचेल, तर पराभूत टीमचं आव्हान संपुष्टात येईल. स्पर्धेची दुसरी सेमी फायनल आजच रात्री 8 वाजता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होईल, या सामन्यातली विजयी टीम आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : 6,0,6,6,4,6... एका ओव्हरमध्ये ठोकल्या 28 रन, मुंबई इंडियन्सच्या बॉलरला बांगलादेशने बेक्कार चोपलं!


