Vaibhav Suryavanshi : सेमी फायनलला वैभव सूर्यवंशी फटाके फोडणार! किती वाजता सुरू होणार मॅच? वेळ नोट करून घ्या!

Last Updated:

इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्यात आशिया कप रायजिंग स्टार 2025 स्पर्धेची सेमी फायनल शुक्रवार 21 नोव्हेंबरला होणार आहे.

सेमी फायनलला वैभव सूर्यवंशी फटाके फोडणार! किती वाजता सुरू होणार मॅच? वेळ नोट करून घ्या!
सेमी फायनलला वैभव सूर्यवंशी फटाके फोडणार! किती वाजता सुरू होणार मॅच? वेळ नोट करून घ्या!
मुंबई : इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्यात आशिया कप रायजिंग स्टार 2025 स्पर्धेची सेमी फायनल शुक्रवार 21 नोव्हेंबरला होणार आहे. फॉर्ममध्ये असलेल्या वैभव सूर्यवंशीवरचा दबाव कमी करण्यासाठी इंडिया ए ला त्यांच्या टॉप ऑर्डरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. वैभव सूर्यवंशी हा 201 रनसह स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. स्पर्धेमध्ये वैभव सूर्यवंशी हाच इंडिया ए ची बॅटिंग सांभाळत आहे. कर्णधार जितेश शर्मा, नमन धीर, प्रियांश आर्या आणि नेहल वधेरा यांना संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळे वैभव सूर्यवंशी लवकर आऊट झाला, तर भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वैभव सूर्यवंशीला बांगलादेशचा फास्ट बॉलर रिपन मोंडोल आणि अलीकडेच बांगलादेश सीनियर टीममध्ये निवड झालेला डावखुरा स्पिनर रकीबुल हसनपासून सावध राहावं लागेल. भारताच्या बॅटिंगमध्ये स्पर्धेत संघर्ष केला असला तरी टीमची बॉलिंग मात्र चांगली होत आहे. फास्ट बॉलर गुरजनपन्नीत सिंगने 3 सामन्यांमध्ये 5 विकेट घेतल्या आहेत. त्याला डावखुरा स्पिनर हर्ष दुबे आणि लेग स्पिनर सुयश शर्मा यांची चांगली साथ मिळाली आहे. या दोघांनीही प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
हर्ष दुबेने बॉलिंगसह बॅटिंगमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ओमानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना अर्धशतक झळकावले होते.

कधी होणार सामना?

इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्यातील आशिया कप रायजिंग स्टार 2025 ची सेमी फायनल शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुरू होईल. तर दुसरी सेमी फायनल पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रात्री 8 वाजता खेळवली जाईल.
advertisement

कुठे पाहता येणार सामना?

इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्यातील आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेची सेमी फायनल सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह दाखवली जाईल, तर सोन लिव्ह ऍपवर मॅचचं थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.

भारत-पाकिस्तान फायनल होणार?

आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. सेमी फायनलमध्ये भारताने बांगलादेशचा आणि पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला, तर फायनलमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होईल. रविवार 23 नोव्हेंबरला स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे. याआधी ग्रुप स्टेजला झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 8 विकेटने पराभव केला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : सेमी फायनलला वैभव सूर्यवंशी फटाके फोडणार! किती वाजता सुरू होणार मॅच? वेळ नोट करून घ्या!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement