आशिया कपची ट्रॉफी तुझ्या घरची नाही... शेलारांची नक्वीला डेडलाईन, ACCच्या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. एसीसीच्या बैठकीमध्ये आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वीला थेट इशारा दिला आहे.
दुबई : भारताने आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत एसीसी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या विरोधात आपला निषेध नोंदवला. बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या भारत आणि बोर्डाच्या अन्य सदस्यांनी नक्वी यांनी भारतीय टीमचं अभिनंदन करावं, अशी मागणी केली. तसंच राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी नक्वी यांनी आशिया कपची ट्रॉफी एसीसी मुख्यालयात सोपवावी, असा इशारा दिला. याशिवाय बीसीसीआयने हे प्रकरण आयसीसीकडे नेणार असल्याचंही स्पष्ट केलं. एसीसी प्रमुखांच्या वृत्तीचा निषेध म्हणून आशिष शेलार यांनी बैठकीवर मध्येच बहिष्कार टाकला.
बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि माजी बोर्ड कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले, जे दोघेही एसीसी बोर्ड सदस्य आहेत. त्यांनी संयुक्तपणे मोहसीन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी दुबईतील एसीसी मुख्यालयात तात्काळ सोपवावी अशी मागणी केली आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत आयसीसीकडे हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं स्पष्ट केलं.
शेलारांचा बैठकीवर बहिष्कार
advertisement
राजीव शुक्ला हे एसीसी बोर्डाचे बीसीसीआय कार्यकारी मंडळ सदस्य आहेत, तर आशिष शेलार हे बीसीसीआयचे पदसिद्ध बोर्ड सदस्य आहेत. शेलार यांनी एसीसी प्रमुखांच्या निषेधार्थ बैठक सुरू असतानाच बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे.
नक्वी ट्रॉफी घेऊन पळाले
भारतीय खेळाडूंनी आशिया कपची ट्रॉफी मोहसिन नक्वी यांच्याकडून घ्यायला नकार दिला, त्यानंतर नक्वी ही ट्रॉफी घेऊन मैदानातून बाहेर गेले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला. त्यानंतर, भारतीय खेळाडूंनी नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी हा पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत, तसंच त्यांनी ऑपरेशन सिंदूरवेळी भारताविरोधी भूमिका घेतली होती, त्यामुळे भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 8:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कपची ट्रॉफी तुझ्या घरची नाही... शेलारांची नक्वीला डेडलाईन, ACCच्या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा