AUS W vs PAK W : 76 रन्सवर 7 विकेट, कोलंबोमध्ये 'लेडी मॅक्सवेल'ने पाकिस्तानला रडवून रडवून मारलं, गोलंदाजांना घाम फोडला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऑस्ट्रेलियाच्या लेडी मॅक्सवेलने 109 धावांची शतकीय खेळी केली आहे.या तिच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावून 221 अशा सन्मानजनक धावा केल्या आहे. तसेच तिच्या खेळीमुळे पाकिस्तान रडकुंडीला आली आहे.
AUS W vs PAK W : बरोबर 2 वर्षापूर्वी वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 47 बॉलमध्ये 201 धावांची नाबाद द्विशतकीय खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याच्या पायात क्रॅम्प आला होता, तरी देखील त्याने मैदान न सोडता अफगाणिस्तानचा तीन विकेटने पराभव केला होता. या खेळीची प्रचंड प्रशंसा झाली होती.आज अशीच खेळी कोलंबोमध्ये पाहायला मिळाली.ऑस्ट्रेलियाच्या लेडी मॅक्सवेलने 109 धावांची शतकीय खेळी केली आहे.या तिच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावून 221 अशा सन्मानजनक धावा केल्या आहे. तसेच तिच्या खेळीमुळे पाकिस्तान रडकुंडीला आली आहे.
आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपमध्ये आज ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान विरूद्ध सामना सूरू आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करून ऑस्ट्रेलियाचे एकामागून एक खेळाडू आऊट केले होते.त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 76 धावांवर 7 विकेट अशी झाली होती. अशा परिस्थितीत एक तर ऑस्ट्रेलियाचा संघ 100 किंवा 150 धावात ऑल आऊट होऊ शकला असता.
पण अशा कठिण परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा बेथ मुनी लेडी मॅक्सवेल बनून संघासाठी धावून आली.तिने एका बाजूने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरून टीचून फलंदाजी केली.बेथ मूनीने एकाकी झूंज देत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली.विशेष म्हणजे नुसती धुलाई केली नाही तर मोक्याच्या क्षणी 109 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत तिने 9 खणखणीत चौकार लगावले आहेत. या दरम्यान तिचा स्ट्राईक रेट 90.91 होता.
advertisement
बेथ मूनीला यावेळी अलाना किंगने चांगली साथ दिली होती. अलाना किंगने 51 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत तिने तीन षटकार आणि तीन चौकार लगावले आहेत.या दोन्ही खेळाडूंच्या वादळी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावून 221 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानकडून डायना नशरा सिंधूने 3,रमीन शमीम आणि फातिमा सनाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. तर सादिक इकबाल आणि डायना बैगने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट गमावून 221 धावा केल्यामुळे आता पाकिस्तानसमोर 222 धावांचे लक्ष्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 7:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS W vs PAK W : 76 रन्सवर 7 विकेट, कोलंबोमध्ये 'लेडी मॅक्सवेल'ने पाकिस्तानला रडवून रडवून मारलं, गोलंदाजांना घाम फोडला