टीम इंडिया ऑस्ट्रेलियात, 'ऍडम झम्पा'चा भारतीय क्रिकेटरला मेसेज, सिक्रेट गोष्ट मागितल्याने खळबळ!

Last Updated:

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ऍडम झम्पा याच्या नावाने भारतीय क्रिकेटपटूला मेसेज करण्यात आला, ज्यात त्याने काही सिक्रेट गोष्टी मागितल्यामुळे खळबळ माजली आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियात, 'ऍडम झम्पा'चा भारतीय क्रिकेटरला मेसेज, सिक्रेट गोष्ट मागितल्याने खळबळ!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात, 'ऍडम झम्पा'चा भारतीय क्रिकेटरला मेसेज, सिक्रेट गोष्ट मागितल्याने खळबळ!
मुंबई : डिजिटल युगात आपण दररोज ऑनलाइन घोटाळ्यांबद्दल ऐकतो. सरकार या घोटाळ्यांना रोखण्यासाठी विविध जागरूकता मोहिमा राबवत आहे, पण तरीही, बरेच लोक अजूनही स्कॅमर्सना बळी पडतात. माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर अशाच एका ऑनलाइन घोटाळ्याशी संबंधित एक घटना शेअर केली आहे. अश्विनला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅडम झम्पा याच्या नावाने स्कॅमरकडून एक मेसेज आला.
अॅडम झम्पा नावाच्या या स्कॅमरने अश्विनकडे अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे या खेळाडूंचे फोन नंबर मागितले. मेसेज मिळताच अश्विनला लगेच लक्षात आले की तो अॅडम झम्पा नाही तर एक स्कॅमर आहे. परिणामी, अश्विनने स्कॅमरला धडा शिकवण्याचं ठरवलं.
advertisement

अश्विनने उडवली स्कॅमरची खिल्ली

अश्विनने आपण स्कॅमर असल्याचं ओखळलं आहे, याची कल्पना त्याला नव्हती. तुला एवढ्याच लोकांचे नंबर हवे आहेत का? आणखी कुणाचे नंबर हवे आहे का? असं अश्विनने विचारलं. तुझ्याकडे धोनीचा नंबर आहे का, का तो पण देऊ? अशी गुगली अश्विनने टाकली, तेव्हा स्कॅमरने आपल्याकडे धोनीचा नंबर असल्याचं सांगितलं. यानंतर अश्विनने मला धोनीचा नंबर दे, कारण माझ्याकडे त्याचा नंबर नाही, असं सांगितलं.
advertisement

याआधीही अश्विनची फसवणूक

अश्विन स्कॅमर्सच्या रडारवर यायची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एका स्कॅमरने आपण न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे असल्याचं सांगून अश्विनची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. 'आयपीएल संपल्यानंतर एका व्यक्तीने मला डेवॉन कॉनवे असल्याचं सांगितलं आणि माझ्याकडे विराट कोहलीचा नंबर मागितला', असं अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर सांगितलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात, 'ऍडम झम्पा'चा भारतीय क्रिकेटरला मेसेज, सिक्रेट गोष्ट मागितल्याने खळबळ!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement