चेन्नईच्या खेळाडूला लागली लॉटरी, IPL मधून थेट सिनिअर संघात एंन्ट्री

Last Updated:

आयपीएलमुळे अनेक खेळाडूंचे करिअर बनले. अनेक खेळाडू या लीगमधून थेट सिनिअर संघात खेळायला गेले.आता अशाच एका खेळाडूचं करिअर आयपीएलमुळे सेट झालं आहे.

dewald bravis
dewald bravis
Dewald Bravis : आयपीएलमुळे अनेक खेळाडूंचे करिअर बनले. अनेक खेळाडू या लीगमधून थेट सिनिअर संघात खेळायला गेले.आता अशाच एका खेळाडूचं करिअर आयपीएलमुळे सेट झालं आहे.हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळायचा. आता त्याला सिनिअर संघात संधी मिळाली आहे.त्यामुळे खेळाडुला लॉटरीच लागली आहे.
दक्षिण आफ्रिका,न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात लवकरच त्रिकोणी मालिका खेळवली जाणार आहे.ही मालिका टी20 स्वरूपात असेल. पुढच्या वर्षी टी-२० विश्वचषक देखील आहे, त्यामुळे ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये खेळणारा खेळाडू संघात परतला आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस असे या खेळाडूचे नाव आहे. आणि तो दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना दिसणार आहे.
advertisement
देवाल्ड ब्रेव्हिसने २०२३ मध्येच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले होते, परंतु सप्टेंबर २०२३ मध्ये त्याने शेवटचा सामनाही खेळला. म्हणजेच तो जास्त काळ संघात राहू शकला नाही. आतापर्यंत ब्रेव्हिसने फक्त दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून पाच धावा केल्या आहेत. पण आता पुन्हा दक्षिण आफ्रिकेने ब्रेव्हिसला बोलावले आहे.
डेवॉल्ड ब्रेव्हिस आयपीएलमध्ये सीएसकेकडून बदली म्हणून खेळताना दिसला. त्याला फक्त ६ सामने खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्याने त्यात २५५ धावा केल्या. त्याची सरासरी ३७ च्या जवळपास होती आणि तो १८० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करत होता. याआधी तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्येही खेळला आहे. पण नंतर संघाने त्याला रिलीज केले.
advertisement
आयपीएलमध्ये सीएसकेकडून अद्भुत खेळ दाखवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने डेवॉल्ड ब्रेव्हिसची आठवण काढली आणि त्याला पुन्हा संघात समाविष्ट करण्यात आले आहे. डेवॉल्ड ब्रेव्हिस बऱ्याच काळानंतर मिळालेल्या संधीचा कसा फायदा घेतो हे पाहणे बाकी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ: रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, नॅन्ड्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, रीझा हेंड्रिक्स, रुबिन हरमन, जॉर्ज लिंडे, क्वेना म्फाका, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, नकाबा पीटर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, अँडिले सिमलेन
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
चेन्नईच्या खेळाडूला लागली लॉटरी, IPL मधून थेट सिनिअर संघात एंन्ट्री
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement