Dharmendra : धर्मेंद्र टीम इंडियाच्या खेळाडूला मानायचे मुलगा, 'ही-मॅन'चं क्रिकेटसोबत होतं खास नातं!

Last Updated:

बॉलिवूडच्या महान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांचं क्रिकेट जगतासोबतही खास नातं होतं. टीम इंडियाच्या एका महान क्रिकेटपटूवर धर्मेंद्र स्वतःच्या मुलाएवढंच प्रेम करत होते.

धर्मेंद्र टीम इंडियाच्या खेळाडूला मानायचे मुलगा, 'ही-मॅन'चं क्रिकेटसोबत होतं खास नातं!
धर्मेंद्र टीम इंडियाच्या खेळाडूला मानायचे मुलगा, 'ही-मॅन'चं क्रिकेटसोबत होतं खास नातं!
मुंबई : बॉलिवूडचा ही-मॅन म्हणून ओळख मिळवलेल्या धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून धर्मेंद्र हे आजारी होते. 12 नोव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, पण 24 नोव्हेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र हे त्यांची दमदार शैली आणि डायलॉग डिलिव्हरीसाठी लोकप्रिय होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं, जे आजही लोकांच्या हृदयात आहे. शोले, प्रतिभा, धर्मवीर या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. डायलॉग डिलिव्हरीमुळेही धर्मेंद्र देशभरात लोकप्रिय झाले.
बॉलिवूडच्या महान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांचं क्रिकेट जगतासोबतही खास नातं होतं. टीम इंडियाच्या एका महान क्रिकेटपटूवर धर्मेंद्र स्वतःच्या मुलाएवढंच प्रेम करत होते. धर्मेंद्र यांना क्रिकेटबद्दल विशेष आकर्षण होते. धर्मेंद्र महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला स्वतःचा मुलगा मानत होते. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकरचा उल्लेख मुलगा म्हणून केला होता.
advertisement

विमानाने एकत्र प्रवास

धर्मेंद्र आणि सचिन तेंडुलकर यांनी एकदा विमानाने एकत्र प्रवास केला होता. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर केला होता. देशाचा अभिमान... आम्ही विमानात अचानक भेटलो. सचिन नेहमीच मला माझ्या लाडक्या मुलासारखा राहिला आहे. त्याला दीर्घायुष्य लाभो. खूप प्रेम असो... अशी पोस्ट धर्मेंद्र यांनी केली होती.
advertisement
सचिन तेंडुलकर हा फक्त भारताताच नाही तर जागतीक क्रिकेट मधला सगळ्यात महान खेळाडू आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 100 शतकं केली आहेत, जो विक्रम अजूनपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही. 24 वर्षांच्या दीर्घ क्रिकेट करिअरनंतर सचिनने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजारांहून जास्त रन आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Dharmendra : धर्मेंद्र टीम इंडियाच्या खेळाडूला मानायचे मुलगा, 'ही-मॅन'चं क्रिकेटसोबत होतं खास नातं!
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement