Dharmendra Property : हेमा मालिनी यांना मिळणार नाही धर्मेंद्र यांची संपत्ती, मग 450 कोटींच्या प्रॉपर्टीवर कोणाचा हक्क?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Property : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या या भव्य संपत्तीचे काय होणार आणि त्यांच्या सहा मुलांना या मालमत्तेत किती वाटा मिळेल, याबाबत चाहत्यांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे.
मुंबई : बॉलिवूडचे लाडके 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली. मुंबईतल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती सुमारे ४०० ते ४५० कोटी रुपये आहे. ते फार्महाऊस आणि आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. मात्र, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या या भव्य संपत्तीचे काय होणार आणि त्यांच्या सहा मुलांना या मालमत्तेत किती वाटा मिळेल, याबाबत चाहत्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
धर्मेंद्र यांच्याकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ एस-क्लास आणि लँड रोव्हर रेंज रोव्हरसह अनेक आलिशान गाड्या आहेत. अशातच दिल्ली हायकोर्टाचे वकील कमलेश कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा आधार घेत धर्मेंद्र यांच्या मालमत्तेच्या वाटपाचे विश्लेषण केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नातील मुली ईशा देओल आणि आहना देओल यांना वारसा हक्क मिळणार का, असा प्रश्न उभा राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 'रेवनसिद्दप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन' या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत दुसरे लग्न अमान्य असले तरी, त्या लग्नातून जन्मलेली मुले कायदेशीररित्या वैध मानली जातात.
advertisement
advertisement
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर, त्यांची चार मुले सनी, बॉबी, अजीता, विजेता आणि हेमा मालिनी यांच्या दोन मुली ईशा, आहना अशा सर्व सहा वारसदारांमध्ये धर्मेंद्र यांच्या हिश्यात आलेली मालमत्ता समान वाटली जाईल. या निर्णयामुळे ईशा आणि आहना यांना कायदेशीर अधिकाराने संपत्तीत हिस्सा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


