14 वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार फुटबॉलचा 'किंग', 4 शहरांमध्ये मेस्सीचा जलवा, महाराष्ट्रच्या मैदानातही उतरणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये येणार आहे. स्वत: मेस्सीने त्याच्या भारत भेटीची पुष्टी केली आहे.
मुंबई : फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये येणार आहे. स्वत: मेस्सीने त्याच्या भारत भेटीची पुष्टी केली आहे. याआधी मेस्सी 2011 साली भारतात आला होता, आता 14 वर्षानंतर आता हा महान फुटबॉलपटू भारतात पुन्हा एकदा येणार आहे. भारतासारख्या फुटबॉलप्रेमी देशात परतणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, असं मेस्सी म्हणाला आहे.
'भारतामध्ये जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. भारत हा अतिशय खास देश आहे. 14 वर्षांपूर्वीच्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत. भारतीय चाहते अद्भुत होते. भारत फुटबॉलसाठी उत्साही देश आहे. मी चाहत्यांच्या नवीन पिढीला भेटण्यासाठी उत्सुक आहे', असं मेस्सी म्हणाला.
आयोजकांनी 15 ऑगस्टलाच मेस्सीच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. 13 डिसेंबरला मेस्सी कोलकात्याला पोहोचेल, यानंतर अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्लीलाही तो भेट देईल. 15 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीने मेस्सीच्या भारत दौऱ्याचा समारोप होईल.
advertisement
अर्जेंटिनाचा हा सुपरस्टार भारत दौऱ्यादरम्यान अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होईल. यामध्ये संगीत कार्यक्रम, भेटीगाठी, फूड फेस्टिव्हल, फुटबॉल मास्टरक्लास आणि मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये पॅडल प्रदर्शनाचा समावेश आहे.
कोलकाता येथील मेस्सीचा कार्यक्रम साल्ट लेक स्टेडियममध्ये होणार आहे, हे स्टेडियम दुसऱ्यांदा या महान खेळाडूचे आयोजन करत आहे. तो 13 डिसेंबर रोजी "GOAT कॉन्सर्ट" आणि "GOAT कप" मध्ये सहभागी होईल.
advertisement
मेस्सी "GOAT कप" मध्ये सौरव गांगुली, बायचुंग भुतिया आणि लिएंडर पेस सारख्या भारतीय क्रीडा दिग्गजांसोबत मैदान शेअर करण्याची अपेक्षा आहे. मेस्सीच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण करण्याचीही आयोजकांची योजना आहे. या कार्यक्रमांची तिकिटे ₹3,500 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:54 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
14 वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार फुटबॉलचा 'किंग', 4 शहरांमध्ये मेस्सीचा जलवा, महाराष्ट्रच्या मैदानातही उतरणार!