Gautam Gambhir : टेस्ट सिरीज गमावली, गंभीरची हकालपट्टी होणार का? गौतम म्हणाला 'माझ्या भविष्याचा निर्णय फक्त...'

Last Updated:

Gautam Gambhir Press Conference : बीसीसीआय माझ्या भविष्याचा निर्णय घेईल. टीम इंडिया सर्वात महत्त्वाची आहे, गंभीर नाही, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.

Gautam Gambhir Press Conference
Gautam Gambhir Press Conference
India vs South Africa : टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात दुर्देवी काळ समोर आला आहे. साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव करून 25 वर्षानंतर रेकॉर्ड रचला आहे. तब्बल 408 धावांनी टेम्बा अँड कंपनीने टीम इंडियाचा घमंड मोडला. त्यानंतर आता गंभीर हेड कोच पदावरून पायउतार होणार का? यावर उत्तर दिलं आहे. त्यावेळी त्याने चेंडू बीसीसीआयच्या पारड्यात टाकला. तसेच नेहमी उर्मठपणे बोलणारा गंभीर यावेळी नरमल्याचं दिसून आलं.

पराभवाला जबाबदार कोण? गंभीर म्हणतो...

टीम इंडियाच्या पराभवाला कुणी एक खेळाडू जबाबदार नाही. पराभवाला सर्वच खेळाडू जबाबदार आहेत. रेड बॉल क्रिकेटमध्ये खुप सुधारणा करण्याची गरज आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जास्त नाही पण रेड बॉल क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दोष सर्वांवर असतो, पण सुरुवात माझ्यापासून होते, असं म्हणत गंभीरने हात झटकण्याचा प्रयत्न केला.
advertisement

बीसीसीआय माझ्या भविष्याचा निर्णय घेईल - गंभीर

क्रिकेटमध्ये टीमच्या भविष्याचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे टीम इंडियाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मी तोच आहे, ज्याने इंग्लंडमध्ये रिझल्ट दाखवून दिला आहे, तेही याच संघासोबत... त्यामुळे आता बीसीसीआयला निर्णय घ्यायचा आहे. बीसीसीआय माझ्या भविष्याचा निर्णय घेईल. टीम इंडिया सर्वात महत्त्वाची आहे, गंभीर नाही, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. ड्रेसिंग रुमची जबाबदारी घेतली पाहिजे. जबाबदारी घेण्यापेक्षा ड्रेसिंगमध्ये काळजी घेण्याची भूमिका महत्त्वाची आहे, असंही गंभीर म्हणाला आहे.
advertisement

गंभीरने स्वत:ला दिलं क्रेडिट

दरम्यान, मी तोच माणूस आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कप जिंकला, असं म्हणत गंभीरने स्वत:ला क्रेडिट दिलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मानसिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही वॉशिंग्टन सुंदरकडून आश्विनसारखी अपेक्षा ठेवत असाल तर ते चुकीचं आहे. ही युवा टीम आहे, त्यामुळे अनुभवाची आणि वेळेची गरज आहे, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir : टेस्ट सिरीज गमावली, गंभीरची हकालपट्टी होणार का? गौतम म्हणाला 'माझ्या भविष्याचा निर्णय फक्त...'
Next Article
advertisement
BMC Election : जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समोर...
जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? BMC निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो
  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

View All
advertisement