Signature Dots Meaning: सहीच्या शेवटी सिंगल डॉट देणारी माणसं या प्रकारात मोडतात; दोन पेक्षा जास्त डॉट्स..

Last Updated:

Signature Dots Meaning: काहीजण सही करून झाल्यानंतर खाली दोन टिंब देतात. अशा पद्धतीनं सही करण्याचे फायदे-तोटे लोकांना माहीत नाहीत. स्वाक्षरी ज्योतिषशास्त्रात, सहीनंतर किंवा खाली दिलेले डॉट काही विशेष अर्थ दर्शवतात. यातून एखाद्या व्यक्तीचे...

News18
News18
मुंबई : सही करण्याची ज्याची त्याची पद्धत निराळी असते. बरेच लोक सही करून झाल्यानंतर शेवटी एक टिंब देतात. काही लोक दोन किंवा तीनसुद्धा डॉट देतात. काहीजण सही करून झाल्यानंतर खाली दोन टिंब देतात. अशा पद्धतीनं सही करण्याचे फायदे-तोटे लोकांना माहीत नाहीत. स्वाक्षरी ज्योतिषशास्त्रात, सहीनंतर किंवा खाली दिलेले डॉट काही विशेष अर्थ दर्शवतात. यातून एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजतेच शिवाय त्याची आर्थिक स्थिती देखील समजते.
सहीच्या शेवटी एक डॉट देणाऱ्यांचा स्वभाव -
स्वाक्षरी (सही) ज्योतिष तज्ज्ञ विवेक त्रिपाठी यांच्या मते, स्वाक्षरीच्या शेवटी एक डॉट असणं म्हणजे ती व्यक्ती वक्तशीर आणि शिस्तबद्ध आहे. कामात प्रामाणिक आहे. असे लोक सोपवलेले कोणतेही काम वेळेवर पूर्ण करतात, काम पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने करतात. असे लोक नियम आणि कायदे पाळतात. त्यांची दैनंदिन कामे देखील पूर्वनिर्धारित असतात, त्या-त्या वेळी ती कामे करण्यास प्राधान्य देतात.
advertisement
अशा लोकांमध्ये एक विशिष्ट नकारात्मक गुण असतो. त्यांच्यात संयम कमी असतो. ते एखाद्या गोष्टीसाठी जास्त वेळ वाट पाहू शकत नाहीत. त्यांना कधी राग येईल हे सांगणं कठीण असतं. तसेच असे लोक छोट्या-छोट्या गोष्टींवरून अस्वस्थ आणि काळजीत पडतात. असे लोक आयुष्यात आणि कामात जास्त प्रयोग करणे टाळतात.
सहीच्या शेवटी सिंगल डॉट देणाऱ्यांनी एकंदरीत सावधगिरी बाळगली पाहिजे; त्यांना अनपेक्षित नशीब दगा देतं. त्यांना अपघात होण्याची शक्यता असते. काही लोकांचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी चांगला पर्याय म्हणजे सहीच्या शेवटी डॉट देणं बंद करा. सहीच्या शेवटी डॉट हा पूर्णविरामही दर्शवितो, म्हणजेच व्यक्ती पुढे काय आहे यासाठी तयार नाही. थोडक्यात ते त्यांच्या भविष्यातील संभाव्यतेला पूर्णविराम देतात.
advertisement
सहीच्या शेवटी दोन डॉट देणारे -
सहीच्या तळाशी किंवा शेवटी दोन डॉट देणारे लोक अनोळखी लोकांशी सहजपणे संवाद साधणारे असतात. असे लोक बहुधा कुटुंबाभिमुख असतात, कुटुंबासोबत वेळ घालवण्यास त्यांना आवडते. अशा लोकांना त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते, त्यांच्या मित्रांचे मोठे सर्कल असते. शिवाय अशी सही करणारे कर्जात बुडालेले असतात. ही गोष्ट आर्थिक नुकसान किंवा कायदेशीर वाद देखील दर्शवते.
advertisement
सहीच्या शेवटी तीन डॉट - सही करताना शेवटी तीन डॉट देणारे लोक कामं लांबणीवर टाकण्याची शक्यता असते. बऱ्याचदा नीट काम पूर्ण करू शकत नाहीत. अर्धे काम करू शकतात आणि उरलेले काम नंतरसाठी सोडून देऊ शकतात. ते कोणत्याही प्रश्नांना किंवा सूचनांना लगेच उत्तर देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडून शक्यतो कामे पुढे ढकलण्याची शक्यता असते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Signature Dots Meaning: सहीच्या शेवटी सिंगल डॉट देणारी माणसं या प्रकारात मोडतात; दोन पेक्षा जास्त डॉट्स..
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement