Mumbai : रेल्वे प्रवासात 'एअरपोर्ट पॅटर्न' लागू; ट्रेनचे दरवाजे बंद होण्यापूर्वी 'हे' करा, नाहीतर प्रवास रद्द

Last Updated:

Central Railway security : सीएसएमटी येथे मेल आणि एक्स्प्रेस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बॅगेज तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. स्कॅनरद्वारे तपासणी पूर्ण झाल्यानंतरच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार असून त्यामुळे रेल्वे परिसरातील सुरक्षा अधिक कडक होणार आहे.

News18
News18
मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी या स्टेशनवर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बॅगेज तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. सीएसएमटी हे मुंबईतील मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे टर्मिनस असून येथून दररोज देशाच्या विविध भागांसाठी शेकडो मेल आणि एक्स्प्रेस गाड्या सुटतात. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी नवी डोकेदुखी
नव्या नियमानुसार सुरक्षारक्षकांकडून बॅगेज स्कॅनरद्वारे तपासणी झाल्याशिवाय टर्मिनसमध्ये प्रवेश दिला जात नाही. विमानतळावर जशी प्रक्रिया असते त्याच प्रमाणे तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या बॅगवर विशेष स्टिकर लावण्यात येत आहे. यामुळे तपासणी झालेली शिवाय न झालेली बॅग ओळखणे अधिक सोपे होणार आहे. तसेच क्लॉक रूममध्ये जमा करण्यात येणाऱ्या सर्व सामानाचीही काटेकोर तपासणी केली जात आहे.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते प्रवाशांकडे वैध तिकीट असणे जितके आवश्यक आहे तितकेच त्यांच्या सोबत असलेल्या सामानाची तपासणी करणेही महत्त्वाचे आहे. बॅगमध्ये कपड्यांव्यतिरिक्त कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू नेली जात नाही ना याची खात्री करणे सुरक्षेसाठी गरजेचे आहे. या उपाययोजनांमुळे रेल्वे परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत.
advertisement
रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर दोन बॅगेज स्कॅनर बसवले आहेत. यासोबतच लोकल प्लॅटफॉर्म, तिकीट काउंटर तसेच एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता बॅगची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार असून एकूणच सीएसएमटीतील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : रेल्वे प्रवासात 'एअरपोर्ट पॅटर्न' लागू; ट्रेनचे दरवाजे बंद होण्यापूर्वी 'हे' करा, नाहीतर प्रवास रद्द
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement