Vastu Tips: श्रीमंती उपभोगलेल्यांची पाच-पन्नास रुपयांसाठी वणवण; घराच्या खिडक्यांची संख्या चुकल्याचा इतका परिणाम
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रात खिडक्यांनाही विशेष महत्त्व आहे, कारण त्यांच्यामधूनच घरात सूर्यप्रकाश, ताजी हवा आणि नैसर्गिक ऊर्जा प्रवेश करते. पुरेसा उजेड आणि हवा फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक शांततेसाठी आणि घराच्या एकूण वातावरणासाठीही आवश्यक असते.
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक घटकाचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. वास्तुनुसार दरवाजा, स्वयंपाकघर, बेडरुम, खिडक्या अशा प्रत्येक भागाची रचना आणि जागा महत्त्वाची असते. या गोष्टी योग्य ठिकाणी असतील तर सकारात्मक ऊर्जा वाढते, अन्यथा नकारात्मक परिणाम दिसून येतात. वास्तुशास्त्रात खिडक्यांनाही विशेष महत्त्व आहे, कारण त्यांच्यामधूनच घरात सूर्यप्रकाश, ताजी हवा आणि नैसर्गिक ऊर्जा प्रवेश करते. पुरेसा उजेड आणि हवा फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक शांततेसाठी आणि घराच्या एकूण वातावरणासाठीही आवश्यक असते. त्यामुळेच वास्तू शास्त्रामध्ये खिडक्यांची संख्या, आकार आणि दिशा याबाबत काही ठराविक नियम सांगितले गेले आहेत.
वास्तू तज्ज्ञांच्या मते, खिडक्या योग्य दिशेला आणि योग्य संख्येत असतील तर घरात सुख-शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास चांगलीच मदत होते. परंतु या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास घरात तणाव, आर्थिक अडचणी आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच घर बांधताना किंवा नूतनीकरण करताना खिडक्यांची संख्या-स्थानाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं मानलं जातं.
advertisement
खिडक्यांची संख्या किती असावी?
वास्तू शास्त्रानुसार घरातील खिडक्यांची संख्या सम असावी, म्हणजेच 2, 4, 6 किंवा 8 अशा संख्येला शुभ मानलं जातं. 3, 5, 7 किंवा 9 यांसारख्या विषम संख्येत खिडक्या असणं टाळावं, असं सांगितलं जातं. सम संख्येतील खिडक्यांमुळे ऊर्जेचा प्रवाह संतुलित राहतो, ज्यामुळे मानसिक शांतता, कुटुंबातील सौहार्द आणि आर्थिक स्थिरता मिळते. त्यामुळे घराची रचना करताना हा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
advertisement
खिडक्यांच्या योग्य दिशेचं महत्त्व -
खिडक्यांची संख्या जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांची दिशा देखील महत्त्वाची मानली जाते. वास्तू शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशेतील खिडक्या अत्यंत शुभ ठरतात. या दिशांकडून येणारा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा घरात सकारात्मक ऊर्जा आणते. पूर्व दिशेकडील सूर्यकिरण आरोग्य, उत्साह आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानले जातात, तर उत्तर दिशा ही संपत्ती, संधी आणि प्रगतीशी संबंधित आहे. या दिशांना खिडक्या असतील तर घरात आनंद कायम राहतो.
advertisement
कोणत्या दिशा टाळाव्यात?
वास्तू शास्त्रानुसार दक्षिण आणि नैऋत्य दिशेला मोठ्या किंवा जास्त खिडक्या असणं शक्यतो टाळावं. या दिशांना खिडक्या असल्यास घराची स्थिरता कमी होऊ शकते. याचा परिणाम म्हणून आर्थिक चढ-उतार, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 8:32 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: श्रीमंती उपभोगलेल्यांची पाच-पन्नास रुपयांसाठी वणवण; घराच्या खिडक्यांची संख्या चुकल्याचा इतका परिणाम









