Prithvi Shaw : पृथ्वी शॉला साईबाबा पावले! मेहनतीचं फळ मिळालं, बऱ्याच काळानंतर आली गुड न्यूज
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शिर्डीच्या साईबाबांनी अखेर पृथ्वी शॉची इच्छा पूर्ण केली आहे. साईबाबांचा एकनिष्ठ भक्त असणाऱ्या पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफीच्या टीमसाठी निवड झाली आहे.
पुणे : शिर्डीच्या साईबाबांनी अखेर पृथ्वी शॉची इच्छा पूर्ण केली आहे. साईबाबांचा एकनिष्ठ भक्त असणाऱ्या पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफीच्या टीमसाठी निवड झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफीच्या मोसमाला सुरूवात होत आहे, यासाठी महाराष्ट्राने 16 खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडू जलज सक्सेनाची टीममध्ये निवड झाली आहे, तर अंकित बावणे याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला गेल्या वर्षीच्या उपविजेत्या केरळ, सौराष्ट्र, चंदीगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब आणि गोवा यांच्यासह ग्रुप बीमध्ये स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान तिरुअनंतपुरम येथे केरळ विरुद्ध होईल.
महाराष्ट्राच्या टीममध्ये सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे, ज्याने यापूर्वी महाराष्ट्राचं नेतृत्व केले आहे. महाराष्ट्राच्या निवड समितीने अनुभवाला प्राधान्य देत राजवर्धन हंगेरगेकरऐवजी प्रदीप दधेची निवड केली आहे.
advertisement
शॉ आणि सक्सेना दोघेही या देशांतर्गत हंगामापूर्वी महाराष्ट्राच्या टीममध्ये सामील झाले. शॉने कठीण काळानंतर त्याची घरची टीम मुंबई सोडली. या काळात, त्याने भारतीय टीममधलं स्थानही गमावलं. आता करिअरची नवी सुरूवात करण्यासाठी शॉ महाराष्ट्राच्या टीममध्ये आला आहे.
दुसरीकडे जलज सक्सेनाने 2005-06 मध्ये मध्य प्रदेशकडून पदार्पण केले. 2016-17 च्या हंगामात तो केरळमध्ये सामील झाला आणि गेल्या वर्षीच्या रणजी ट्रॉफी फायनलमध्ये खेळला, ज्यामध्ये टीमला विदर्भाकडून पराभव पत्करावा लागला. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात (2024-25) महाराष्ट्राने एलिट ग्रुप ए पॉइंट टेबलमध्ये पाचवे स्थान पटकावले होते, ज्यामध्ये सात सामन्यांपैकी दोन विजय, दोन अनिर्णित आणि तीन पराभव होते.
advertisement
महाराष्ट्राची टीम
अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, सौरभ नवले (विकेटकीपर), मंदार भंडारी (विकेट कीपर), जलज सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दधे, हितेश वाळुंज, सिद्धार्थ म्हात्रे, हर्षल काटे, रजनीश गुरबानी
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 11:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Prithvi Shaw : पृथ्वी शॉला साईबाबा पावले! मेहनतीचं फळ मिळालं, बऱ्याच काळानंतर आली गुड न्यूज