GT vs CSK सामन्यात घडली मोठी चूक, भारताचा माजी कोच,एक्स्पर्ट असतानाही रवि शास्त्रींना हिशोब कळला नाही!

Last Updated:

गुजरात आता टॉप 2 मधून बाहेर होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा माजी कोच आणि इतका मोठा एक्सपर्ट असताना देखील रवी शास्त्रींकडून मोठी चूक घडली आहे. नेमकं त्याने काय केलं आहे. हे जाणून घेऊयात.

ravi shastri ipl 2025
ravi shastri ipl 2025
GT vs CSK : आयपीएलच्या आजच्या सामन्यात प्लेऑफमधून बाहेर झालेल्या चेन्नई सूपर किंग्जने 82 धावांनी टेबल टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे.या पराभवानंतर गुजरातला मोठा धक्का बसला आहे. कारण गुजरात आता टॉप 2 मधून बाहेर होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा माजी कोच आणि इतका मोठा एक्सपर्ट असताना देखील रवी शास्त्रींकडून मोठी चूक घडली आहे. नेमकं त्याने काय केलं आहे. हे जाणून घेऊयात.
खरं तर गुजरात टायटन्स चेन्नई विरूद्धचा सामना जिंकला असता तर त्यांचे गुण 20 झाले असते. या गुणांसह गुजरात टायटन्स क्वालिफाय सामना खेळणारी पहिली टीम ठरली होती. इतकं साध सोप्प समीकरण असताना देखील रवि शास्त्री मात्र गुजरातच्या नेट रटनेटवरच संपूर्ण मॅच काँमेंट्री करत असताना भाष्य करत राहिले.त्यामुळे रवि शास्त्रीकडून ही मोठी चूक घडली आहे.
advertisement
पॉईट्स टेबल पाहिला तर नेट रनरेटचा कुठेच जास्त वापर होत नसल्याचे दिसत आहे.कारण चारही संघाचे गुण एकदम वेगवेगळे आहे. आणि रनरेट बद्दल बोलायचं झाल तर मुंबईचा रनरेट हा सर्वाधिक आहे. बाकी संघाचा त्या तुलनेत खूपच कमी आहे.
आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुंबई सारखेच जर दुसऱ्या कोणत्या संघाला गुण पडले तर त्यावेळेस नेट रनरेटच्या बळावर मुंबई आघाडीवर असेल आणि दुसरी टीम पिछाडीवर येईल.आता गुजरात 18 गुणांसह गुजरात पहिल्या स्थानी आहे. उद्या मुंबई विरूद्ध पंजाब यांच्यात सामना रंगणार आहे. जर मुंबई जिंकली तर तिचे 18 पॉईट्स होतील आणि ती पहिल्या क्रमांकावर येईल आणि जर पंजाब जिंकली तर ती टेबल टॉपला जाईल. आरसीबी देखील लखनऊ विरूद्ध जिंकली तर तिली देखील पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे.
advertisement
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसीद कृष्णा
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (w/c), नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
GT vs CSK सामन्यात घडली मोठी चूक, भारताचा माजी कोच,एक्स्पर्ट असतानाही रवि शास्त्रींना हिशोब कळला नाही!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement