फ्री, फ्री, फ्री... फॅन्ससाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार आशिया कपच्या सामन्यांची तिकिटं, मोठी घोषणा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Asia Cup Hockey 2025 : तिकिटे बुक करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. हॉकीचे चाहते wwe.ticketgenie.in किंवा हॉकी इंडियाच्या अॅपवर जाऊन मोफत तिकिटे बुक करू शकतात.
Asia Cup 2025 Tickets Free : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे हॉकी पुरुष आशिया कप 2025 ट्रॉफीचे अनावरण केले. ही स्पर्धा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे होणार आहे. भारतीय हॉकी संघाचा पहिला सामना 29 ऑगस्ट रोजी चीनशी बिहारमधील राजगीर येथे खेळवला जाईल. या सामन्याचा आनंद तुम्ही देखील फ्री मध्ये घेऊ शकता. हॉकी इंडियाने यासाठी एक मोठी घोषणा केलीये.
मोफत तिकिटे बुक करा
तिकिटे बुक करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. हॉकीचे चाहते wwe.ticketgenie.in किंवा हॉकी इंडियाच्या अॅपवर जाऊन मोफत तिकिटे बुक करू शकतात. येथे, प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला व्हर्च्युअल तिकीट मिळेल. व्हर्च्युअल तिकिटांमुळे चाहत्यांसाठी सोपे होईल आणि प्रत्येकजण त्यांच्या जागेवर सहज पोहोचू शकेल.
भारताचा समावेश 'अ' गटात
advertisement
हिरो मेन्स एशिया कप राजगीर, बिहार 2025 च्या सर्व सामन्यांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान नव्याने बांधलेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर खेळवण्यात येणारी ही स्पर्धा बिहारच्या (राजगीर) मध्यभागी हॉकीचा एक भव्य उत्सव असल्याचे आश्वासन देते, असं हॉकी इंडियाने म्हटलं आहे. भारताचा समावेश 'अ' गटात आहे, या गटात भारतासोबत चीन, जपान आणि कझाकस्तान यांचा समावेश आहे.
advertisement
भारताचे सामने कसे असतील?
29 ऑगस्ट: भारत हॉकी विरुद्ध चीन हॉकी
31 ऑगस्ट: भारत हॉकी विरुद्ध जपान हॉकी
1 सप्टेंबर: भारत हॉकी विरुद्ध कझाकस्तान हॉकी
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 1:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
फ्री, फ्री, फ्री... फॅन्ससाठी आनंदाची बातमी! मोफत मिळणार आशिया कपच्या सामन्यांची तिकिटं, मोठी घोषणा!


