IND vs AUS : गंभीरने शेवटी मनासारखं केलं! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता, लाडक्याचा केला डेब्यू!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Australia 1st ODI Playing XI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने शुभमन गिलने तीन मोठे बदल केले आहेत. त्यातील एक निर्णय धक्कादायक आहे.
India vs Australia 1st ODI : हेड कोच गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांच्या 'मिशन ऑस्ट्रेलिया'ला सुरूवात झाली आहे. कॅप्टन म्हणून शुभमन गिल पहिला सामना खेळेल. तर टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल केले गेले आहे. युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डू याला ऑलराऊंडर म्हणून संघात सामील करून घेतलं असून तो पर्थवर आपला वनडे डेब्यू करणार आहे. अशातच आता गौतम गंभीरच्या एका निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे.
तीन ऑलराऊंडर खेळवण्याचा निर्णय
गौतम गंभीर याला नेहमी बॅटिंग ऑर्डरची भीती वाटते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील गंभीरची ही भीती समोर आली. गंभीरने पहिल्याच वनडे सामन्यात तीन ऑलराऊंडर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आणि आशिया कप जिंकवणाऱ्या कुलदीप यादवला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
advertisement
A day he will never forget!
It's a special moment for debutant Nitish Kumar Reddy, who receives his ODI cap from Rohit Sharma
Updates ▶ https://t.co/O1RsjJTHhM#TeamIndia | #AUSvIND | @NKReddy07 pic.twitter.com/ZpJUaiQqC5
— BCCI (@BCCI) October 19, 2025
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 9:06 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : गंभीरने शेवटी मनासारखं केलं! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता, लाडक्याचा केला डेब्यू!