Kalyan News : बापरे! गाडी सुरु करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीसोबत घडलं भयंकर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Last Updated:

Kalyan Shocking News : कल्याण आधारवाडी परिसरात एका स्कुटीच्या हेडलाईटमध्ये विषारी साप आढळला. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे साप सुरक्षितपणे पकडला गेला.

News18
News18
कल्याण : कल्याणच्या आधारवाडी परिसरात घडलेली घटना ऐकून तुम्हचाही थरकाप उडेल.  ज्यात रात्रीच्या सुमारास एका स्कुटीच्या हेडलाइटमध्ये अत्यंत विषारी साप लपलेला होता. सुदैवाने दुचाकीस्वाराचे वेळीच लक्ष गेल्याने कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही.परंतू सोशल मीडियावर या सर्व घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमके घडले काय?
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील एक व्यक्ती सोबत ही घटना घडली आहे. ज्यात साधारण साडेदहाच्या सुमारात एक व्यक्ती स्कुटीवरुन बाहेन जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान ते गाडी सुरु करणार होते तो पर्यंत त्याच लक्ष स्कुटीच्या हेडलाईटकडे गेले. त्यानंतर त्यांनी पाहिले ते साप लपलेला होता.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना समजताच त्यांच्या पैकी एकाने सर्पमित्रांना दिली. काही मिनिटांत सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि पाहिले की गाडीत बसलेला साप खूपच विषारी आहे. त्यांनी परिसर रिकामा करून सुरक्षिततेची काळजी घेतली. गाडीची तपासणी करण्यासाठी बाईक मेकॅनिक यांची मदत घेण्यात आली. त्यांनी काळजीपूर्वक स्कुटीचा फ्रंट कव्हर उघडला आणि सर्पमित्रांनी अत्यंत दक्षतेने सापाला पकडले. काही वेळानंतर सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
advertisement
या घटनेनंतर परिसरातील नागरिक सर्पमित्रांच्या तत्परतेचे कौतुक करत आहेत. सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की साप दिसल्यास घाबरू नका, लगेच त्यांच्याशी संपर्क साधा. आधारवाडी परिसरात पावसाळ्यानंतर अशा घटना वारंवार घडतात, त्यामुळे नागरिकांनी सतत जागरूक राहणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News : बापरे! गाडी सुरु करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीसोबत घडलं भयंकर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement