महाराष्ट्राच्या 13 वर्षाच्या पोरीने दाखवली जादू, लुईस सुआरेझच्या पायाखालून काढला बॉल, मेस्सीही बघतच राहिला! पाहा Video

Last Updated:

Leo messi Shock to see Maharashtra 13 year old Girl : बॉल पायाखालून गेल्यावर सुआरेझ लगेच प्रतिक्रिया दिली. त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला.

Leo messi Shock to see Maharashtra 13 year old Girl
Leo messi Shock to see Maharashtra 13 year old Girl
Tanishka Kawade nutmegged Luis Suarez : जगातील स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी ( Lionel messi) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. मेस्सीसोबत लुईस सुआरेझ (Luis Suarez) आणि रोड्रिगो डी पॉल (Rodrigo De Paul) हे दोघंही भारत दौऱ्यावर आले आहेत. अशातच महाराष्ट्रातील एका 13 वर्षाच्या पोरीने जगातील स्टार लुईस सुआरेझ याला चकित केलं. त्यावेळी मेस्सी देखील आश्चर्यचकित झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लुईस सुआरेझला दिला चकवा

मेस्सीच्या स्वागतासाठी मैदान खचाखच भरले असताना, 60 लहान मुलांना मेस्सीसोबत मैदानात फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली. याच दरम्यान एक क्षण कॅमेरात कैद झाला, ज्यामुळे उपस्थित स्टार खेळाडूही थक्क झाले. 13 वर्षांची तनिष्का कवडे हिच्या पायाजवळ बॉल आला. तिने कोणतीही भीती न बाळगता, क्षणात निर्णय घेऊन थेट लुईस सुआरेझला 'नटमेग' (चकवा) दिला. सुआरेझला देखील पोरीच्या किकचं कौतूक वाटलं.
advertisement

तनिष्कासाठी अविस्मरणीय क्षण

बॉल पायाखालून गेल्यावर सुआरेझ लगेच प्रतिक्रिया दिली. त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. तर मेस्सीने देखील तिच्या किकला दाद दिली. हा तनिष्कासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. तिने नंतर सांगितलं की, "त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी फक्त आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. माझे स्वप्न रोनाल्डोला भेटण्याचे होतं, पण मी मेस्सीला भेटले, ते देखील माझ्यासाठी एक मोठं स्वप्न होतं, असंही ती म्हणाली.
advertisement

मेस्सीला पाहताच रडायला सुरुवात

तनिष्काला मेस्सीला प्रत्यक्ष भेटण्याची संधीही मिळाली. तिने आपल्या हातावर मेस्सीचं नाव लिहिलं होतं, जे पाहून मेस्सी तिच्याकडे पाहून हसला. या दौऱ्यात सहभागी झालेल्या इतर मुलींसाठीही हे क्षण खूप भावनिक ठरले. 13 वर्षीय तनिष्काने तर मेस्सीला पाहताच रडायला सुरुवात केली. मेस्सीला पहिल्यांदा पाहण्याचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि स्वप्नवत वाटत होता, असं तिने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
advertisement

दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती

मेस्सीसोबत मैदानात असलेल्या मुली 'प्रोजेक्ट महादेवा' नावाच्या युवा फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेस्सीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. निवड झालेल्या 60 मुलांना पुढील पाच वर्षांसाठी संरचित प्रशिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी मासिक दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
advertisement

कोण आहे लुईस?

दरम्यान, लुईस हा मेस्सीचा इंटर मियामीमधील संघसहकारी आणि उरुग्वेचा अनुभवी खेळाडू आहे. तर रोड्रिगो डी पॉल अर्जेंटिना राष्ट्रीय संघाचा खेळाडू असून, मेस्सीसोबत फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
महाराष्ट्राच्या 13 वर्षाच्या पोरीने दाखवली जादू, लुईस सुआरेझच्या पायाखालून काढला बॉल, मेस्सीही बघतच राहिला! पाहा Video
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement