IND vs AUS : भारताच्या 136 धावा तरी ऑस्ट्रेलियासमोर 131 रन्सचं आव्हान कसं ?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत 136 धावा करु शकली. खरं तर 26 ओव्हरच्या तुलनेत या कमीच धावा आहेत. त्यात आता आयसीसीच्या एका नियमानूसार या धावा कमी होणार आहेत.त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे आव्हान असणार आहे.
India vs Australia 1st Odi : पर्थच्या मैदानावर टीम इंडिया फुसका बार ठरली आहे. कारण पावासामुळे पार पडलेल्या 26 ओव्हरच्या सामन्यात भारताने अवघ्या 136 धावाच करू शकली. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 38 धावा केल्या. या धावा आणि शेवटच्या क्षणी नितीश कुमार रेड्डीच्या बॅटीतून आलेल्या नाबाद 19 धावांच्या बळावर भारत 136 धावा करु शकली. खरं तर 26 ओव्हरच्या तुलनेत या कमीच धावा आहेत. त्यात आता आयसीसीच्या एका नियमानूसार या धावा कमी होणार आहेत. त्यामुळे हा नियम काय सांगतो? आणि ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे आव्हान कसं असणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती.टीम इंडियाची सुरूवात खूपच खराब झाली होती. कारण 7 महिन्यांनी मैदानात वापसी करणारा रोहित शर्मा अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्याच्या मागोमाग विराट कोहली मैदानात आला. पण तो देशील शून्य धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला.
advertisement
तीन महत्वाचे विकेट पडल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोठ्या धावा करता आल्या नाही.श्रेयस अय्यर 11वर गेला. तर अक्षरने 31 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 10 धावांवर बाद झाला. भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने केल्या. राहुलने 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर हर्षित राणा आणि अर्शदिपची विकेट पडली.
advertisement
शेवटच्या क्षणी नितीश रेड्डी क्रिजवर उभा राहिला म्हणून भारतावरचं ऑलआऊट संकट टळलं आणि त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स मारून भारताचा डाव 136 पर्यत नेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 137 धावांचे आव्हान असणे अपेक्षित होते. पण डीएलएस मेथडमुळे ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे आव्हान असणार आहे. आता टीम इंडिया या धावा रोखण्यात यशस्वी ठरते की ऑस्ट्रेलिया जिंकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
डकवर्थ लुईस स्टर्न नियम काय आहे?
पावसामुळे खराब झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये लक्ष्य आणि निकाल निश्चित करण्यासाठी डकवर्थ-लुईस-स्टर्न किंवा डीएलएस पद्धत वापरली जाते. ही पद्धत इंग्रजी सांख्यिकीशास्त्रज्ञ फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांनी विकसित केली होती आणि त्यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. 1997 मध्ये पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला. ऑस्ट्रेलियन सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्ह स्टर्न यांनी 2015 च्या विश्वचषकापूर्वी या पद्धतीत बदल करून तिचे नाव डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत असे ठेवले.
advertisement
डीएलएस पद्धतीचा वापर करून, विकेट आणि षटके दोन्ही विचारात घेतले जातात. त्यांना संसाधने म्हणतात. संसाधनांच्या उपलब्धतेनुसार लक्ष्य सुधारित केले जाते. डावाच्या सुरुवातीला, संघाकडे 100 टक्के संसाधने (50 षटके आणि 10 विकेट) उपलब्ध असतात. जसजसे जास्त विकेट पडतात आणि चेंडू वापरला जातो तसतसे संसाधनांचे प्रमाण वेगाने कमी होते.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 3:53 PM IST