Bhaubij 2025: ओवाळिते मी भाऊराया..! पाठावर बसलेल्या भावाचं तोंड या दिशांना असणं मंगलदायी

Last Updated:

Bhai Dooj Tilak: वास्तुशास्त्रानुसार औक्षण करण्यासाठी बसण्याच्या दिशेला खूप महत्त्व आहे? कोणत्या दिशेला तोंड करून भाऊ बसलाय, याचा त्याच्या आयुष्यावर आणि दोघांच्यातील नात्यावर थेट परिणाम होतो, असं मानलं जातं. त्यामुळे..

News18
News18
मुंबई : भाऊबीजेचा सण प्रत्येक भाऊ-बहिणींसाठी खूप खास असतो. हा दिवस नात्यातील गोडवा आणि आपलेपणाचं प्रतीक आहे. दिवाळीनंतर काही दिवसांनी येणाऱ्या या सणाचे विशेष महत्त्व आहे. बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करते. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा (नाम ओढून) ओवाळते, त्याला खास पदार्थ खाऊ घालते. पण तुम्हाला माहीत आहे का, वास्तुशास्त्रानुसार औक्षण करण्यासाठी बसण्याच्या दिशेला खूप महत्त्व आहे? कोणत्या दिशेला तोंड करून भाऊ बसलाय, याचा त्याच्या आयुष्यावर आणि दोघांच्यातील नात्यावर थेट परिणाम होतो, असं मानलं जातं. त्यामुळे, या भाऊबीजेला जर तुम्हाला वाटत असेल की भावाच्या जीवनात सकारात्मकता, प्रगती आणि चांगले आरोग्य कायम राहावे, तर वास्तुचे हे खास नियम जाणून घ्या. ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचे अभ्यासक अंशुल त्रिपाठी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
वास्तुशास्त्रानुसार, ओवाळताना भावाला उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसवावे. उत्तर दिशा ही धन आणि संधींची दिशा मानली जाते. या दिशेला औक्षण केल्यानं भावाच्या करिअरमध्ये आणि आर्थिक जीवनात स्थिरता येते.
पूर्व दिशा ज्ञान, बुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. या दिशेकडे तोंड करून औक्षण-नाम लावल्यास नात्यात समज आणि प्रेम वाढते. घरात जागेची कमतरता असेल किंवा दिशेबद्दल शंका असेल, तर तुम्ही मोबाईल कंपासने नेमकी दिशा पाहू शकता.
advertisement
बहिणीने कोणत्या दिशेला बसावे - भाऊ उत्तर किंवा पूर्वेकडे पाहत असेल, तेव्हा बहिणीने दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसावे. यामुळे ऊर्जेचा समतोल व्यवस्थित राहतो आणि टिळक लावण्याची विधी शुभ मानली जाते.
कुंकवाचा टिळा लावणं सर्वात शुभ मानलं जातं. लाल रंग ऊर्जा, साहस आणि प्रेमाचे प्रतीक आहे. हवे असल्यास, तुम्ही थोडे तांदूळ (अक्षत) मिसळूनही टिळक लावू शकता. हा टिळक भावाच्या आयुष्यात स्थिरता आणि प्रगती आणतो.
advertisement
औक्षण करताना मनात शुभ विचार आणि आशीर्वाद ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भावाच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना करा. तुम्ही मनातल्या मनात “सौभाग्यवती भव” किंवा “आयुष्मान भव” असे आशीर्वादाचे शब्द बोलू शकता.
औक्षण झाल्यावर लगेच दिशा बदलू नये, भावाने थोडा वेळ त्याच दिशेला बसून राहावे. यामुळे त्या दिशेची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे स्वीकारली जाते. त्यानंतर बहिणीने भावाला मिठाई खाऊ घालावी.
advertisement
कोणत्या दिशेला बसू नये वास्तूनुसार, टिळक लावताना भावाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) किंवा पश्चिम-दक्षिण दिशेकडे तोंड करू नये. ही दिशा जडपणा आणि अडथळ्यांचे संकेत देते. अशा दिशेला टिळक लावल्याने मन खिन्न होण्याची किंवा भांडणांची शक्यता वाढू शकते.
भाऊबीज हा फक्त ओवाळण्याचा नव्हे, तर भावनांना जोडण्याचा काळ आहे. या दिवशी वास्तुशास्त्रानुसार दिशा आणि ऊर्जेची काळजी घेतली, तर भाऊ-बहिणीचे नाते अधिक मजबूत होते. योग्य दिशेला बसून औक्षण केवळ भावाचे आयुष्यच वाढत नाही, तर कुटुंबात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जाही टिकून राहते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Bhaubij 2025: ओवाळिते मी भाऊराया..! पाठावर बसलेल्या भावाचं तोंड या दिशांना असणं मंगलदायी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement