Rohit Sharma : रोहितने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला, विजयापेक्षा हिटमॅनच्या वर्ल्ड रेकॉर्डची चर्चा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावलं आहे. याआधी ऍडलेडमध्ये रोहितने अर्धशतकी खेळी केली होती. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं रोहित शर्माचं हे 33वं शतक आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावलं आहे. याआधी ऍडलेडमध्ये रोहितने अर्धशतकी खेळी केली होती. रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं रोहित शर्माचं हे 33वं शतक आहे. 105 बॉलमध्ये त्याने हे शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 237 रनचं आव्हान पार करायला आलेल्या रोहित शर्माने कर्णधार शुभमन गिलसोबत 69 रनची पार्टनरशीप केली, पण गिलची विकेट गेल्यानंतर रोहितने विराटसोबत शतकी पार्टनरशीप केली, ज्यामुळे टीम इंडियाला या आव्हानाचा पाठलाग करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. रोहित शर्माने 125 बॉलमध्ये नाबाद 121 रन केले, ज्यात 13 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर विराटने 81 बॉलमध्ये नाबाद 74 रन केले. विराटने त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर मारल्या.
रोहितचा ऑस्ट्रेलियामध्ये विक्रम
या शतकासोबतच रोहितने बरेच विक्रमही केले आहेत. एका टीमविरुद्ध सर्वाधिक वनडे शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता 9 वनडे शतकं आहेत. सचिन तेंडुलकरनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 वनडे शतकं केली होती, तर विराट कोहलीची वेस्ट इंडिजविरुद्ध 9 शतकं आहेत. या यादीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध 10 शतकं केली आहेत.
advertisement
रोहित शर्माचं ऑस्ट्रेलियामधलं वनडे क्रिकेटमधलं हे 6 वे शतक होते. ऑस्ट्रेलियामध्ये रोहितने 33 वनडे इनिंगमध्ये बॅटिंग केली आहे. परदेशी खेळाडूने ऑस्ट्रेलियामध्ये मारलेली ही सर्वाधिक वनडे शतकं आहेत. या यादीत विराट कोहली 5 शतकांसह दुसऱ्या आणि कुमार संगकारा 5 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने ऑस्ट्रेलियामध्ये 32 वनडे इनिंगमध्ये आणि संगकाराने 49 वनडे इनिंगमध्ये बॅटिंग केली आहे.
advertisement
रोहितचं 50वं शतक
रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे 50 वे शतक होतं. रोहितच्या नावावर टेस्टमध्ये 12, वनडेमध्ये 33 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 5 शतकं आहेत. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त शतकं असणारा रोहित शर्मा हा जगातला एकमेव खेळाडू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 3:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहितने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला, विजयापेक्षा हिटमॅनच्या वर्ल्ड रेकॉर्डची चर्चा!


