IND vs AUS: 21 दिवसांचा दौरा, 8 थरारक मॅच; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेचे पूर्ण शेड्यूल जाणून घ्या

Last Updated:

India Series Against Australia: भारतीय निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला वनडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून सूर्यकुमार यादव टी-20 संघाचे नेतृत्व करणार आहे.

News18
News18
मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी आज शनिवारी भारतीय संघाची घोषणा झाली. टीम इंडिया या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळणार आहे. या मालिकेसह भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा पर्व संपून गिल पर्वाचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. निवड समितीने रोहितच्या जागी वनडेचा कर्णधार म्हणून गिलची निवड केली आहे. याआधी गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. सध्या टी-20चा कर्णधार सूर्यकुमार यादव असून भविष्यात ही जबाबदारी देखील गिलकडे येण्याचे संकेत निवड समिती प्रमुख आजित आगरकर यांनी दिले आहेत.
advertisement
भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरूवात 19 ऑक्ट्रोबरपासून होईल. टीम इंडिया प्रथम वनडे मालिका खेळणार आहे. पहिली वनडे पर्थ स्टेडियमवर 19 ऑक्टोबरला त्यानंतर 23 ऑक्टोबरला दुसरी वनडे अ‍ॅडलेड ओव्हलवर आणि 25 ऑक्टोबरला अखेरची वनडे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होईल.
advertisement
वनडे मालिकेनंतर 29 ऑक्टोबरला कॅनबेरामधील मनुका ओव्हलवर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर 31 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर, 2 नोव्हेंबरला होबार्टमधील बेलरिव्ह ओव्हलवर, 6 नोव्हेंबरला गोल्ड कोस्ट स्टेडियमवर आणि 8 नोव्हेंबरला ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिमवर मॅच होईल.
advertisement
दिनांकसामनास्थळवेळ (भारत)
19 ऑक्टोबर, रवि1ली वनडेपर्थ स्टेडियम, पर्थसकाळी 9:00
23 ऑक्टोबर, गुरु2री वनडेअ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेडसकाळी 9:00
25 ऑक्टोबर, शनि3रा वनडेसिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनीसकाळी 9:00
29 ऑक्टोबर, बुध1ली टी-20मनुका ओव्हल, कॅनबेरादुपारी 1:45
31 ऑक्टोबर, शुक्र2री टी-20मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्नदुपारी 1:45
2 नोव्हेंबर, रवि3री टी-20बेलरिव्ह ओव्हल, होबार्टदुपारी 1:45
6 नोव्हेंबर, गुरु4थी टी-20बिल पिपेन ओव्हल, गोल्ड कोस्टदुपारी 1:45
8 नोव्हेंबर, शनि5वी टी-20द गाबा, ब्रिस्बेनदुपारी 1:45
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असली तरी अद्याप ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झालेला नाही. गिलच्या नेतृत्वाखाली या दौऱ्यात टीम इंडियाला मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. गिलने इंग्लंड दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले होते आणि मालिका बरोबरीत सोडवली होती. आता मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची ऑस्ट्रेलियात खरी कसोटी लागणार आहे.
advertisement
भारताचा वनडे संघ-
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल.
advertisement
भारताचा टी-20 संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS: 21 दिवसांचा दौरा, 8 थरारक मॅच; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेचे पूर्ण शेड्यूल जाणून घ्या
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement