IND vs ENG : एवढी मेहरबानी कशाला? पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा व्हिलन, तरी गिल-गंभीरचा आशिर्वाद!

Last Updated:

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला बुधवार 2 जुलैपासून सुरूवात होणार आहे. दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स अजून कायम आहे.

एवढी मेहरबानी कशाला? पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा व्हिलन, तरी गिल-गंभीरचा आशिर्वाद!
एवढी मेहरबानी कशाला? पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा व्हिलन, तरी गिल-गंभीरचा आशिर्वाद!
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला बुधवार 2 जुलैपासून सुरूवात होणार आहे. दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स अजून कायम आहे, पण टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वेगळ्याच खेळाडूमुळे वाढलं आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने गिल आणि गंभीरची डोकेदुखी वाढवली आहे. जडेजाने पहिल्या सामन्यात 47 ओव्हर बॉलिंग करून 172 रन दिले होते, तसंच त्याला फक्त एकच विकेट घेता आली.
मॅचच्या शेवटच्या दिवशी खेळपट्टी स्पिन बॉलिंगला मदत करत असतानाही जडेजाने 24 ओव्हरमध्ये 102 रन देऊन फक्त एक विकेट मिळवली. बेन डकेटने जडेजाच्या बॉलिंगवर तब्बल 30 वेळा रिव्हर्स स्वीप शॉट मारले. जडेजाच्या या अपयशामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, त्यानंतर आता त्याला दुसऱ्या टेस्टमध्ये खेळवायचं का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
advertisement
पहिल्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी बेन डकेटने जडेजावर रिव्हर्स स्वीप करून आक्रमण केलं. जडेजाला डकेटच्या ऑफ स्टम्प बाहेर पडलेल्या खड्ड्यामध्ये बॉल टाकून स्पिन करता येत नव्हता. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण टीम इंडिया जर दोन खेळाडूंना घेऊन मैदानात उतरली, तर मात्र जडेजाला संधी मिळेल.
advertisement

इंग्लंडमध्ये जडेजाचा स्ट्राईक रेट 102.6

इंग्लंडमधील रवींद्र जडेजाचं रेकॉर्डही निराशाजनक आहे. जडेजाने इंग्लंडमध्ये 13 टेस्ट खेळल्या ज्यात त्याला फक्त 28 विकेट घेता आल्या, यात त्याचा स्ट्राईक रेट 102.6 आहे. म्हणजेच जडेजाला इंग्लंडमध्ये एक विकेट घेण्यासाठी 17 ओव्हर बॉलिंग करावी लागते. आता इंग्लंडमधील जडेजाची ही कामगिरी समोर असतानाही गिल-गंभीर त्याच्यावर इतके मेहरबान का? असा सवाल उपस्थित होतो.
advertisement

जडेजाऐवजी दोन पर्याय

दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाकडे रवींद्र जडेजाऐवजी दोन पर्याय आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव, पण जडेजाचं शानदार बॅटिंग रेकॉर्ड पाहता त्याला टीम बाहेर करणं गिल आणि गंभीरसाठी सोपं नसेल. कुलदीप यादव हा आक्रमक स्पिन बॉलर म्हणून ओळखला जातो, जो टीम इंडियाला विकेट काढून देऊ शकतो, पण कुलदीप बॅटिंग करू शकत नाही. पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये टीम इंडियाची खालची फळी सपशेल अपयशी ठरलेली असताना दुसऱ्या सामन्यात गिल आणि गंभीर जडेजाला बाहेर ठेवून कुलदीपला खेळवण्याचा धोका पत्करेल का? याचं उत्तर पुढच्या काही तासात मिळेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : एवढी मेहरबानी कशाला? पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा व्हिलन, तरी गिल-गंभीरचा आशिर्वाद!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement