IND vs ENG : टीम इंडियासाठी गूडन्यूज,पाचव्या दिवशी मॅच पलटणार, इंग्लंडच्या हातून मॅच निसटणार?

Last Updated:

टीम इंडियाच्या या दोन पठ्ठ्यांनी जी खेळी केली आहे ती पाहून टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखीण वाढला आहे.तसेच सामना जिंकण्याची आशा निर्माण झाली आहे. या दरम्यान टीम इंडियासाठी मोठी गूडन्यूज समोर आली आहे.

ind vs eng 4th test
ind vs eng 4th test
India vs England 4th Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने 2 विकेट गमावून 174 धावा केल्या आहेत.यामध्ये शुभमन गिल 78 धावांवर तर केएल राहुल 87 धावांवर नाबाद आहे. आणि टीम इंडिया अजूनही 137 धावा मागे आहे. टीम इंडियाच्या या दोन पठ्ठ्यांनी जी खेळी केली आहे ती पाहून टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखीण वाढला आहे.तसेच सामना जिंकण्याची आशा निर्माण झाली आहे. या दरम्यान टीम इंडियासाठी मोठी गूडन्यूज समोर आली आहे.या गूडन्यूज भारताचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.
खरं तर चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सेशनमध्ये शुभमन गिल आणि केएल राहुल तब्बल 60 ओव्हर इंग्लंडला तगडी झुंज दिली. इंग्लंडला विकेट घेण्याची संधीच दिली नाही. आणि तब्बल साडे चार तास हे दोघेही मैदानावर एका योद्ध्यासारखे खेळले.त्यामुळे चौथ्या दिवशी टीम इंडियाने अर्धी लढाई जिंकली आहे.अजून अर्धी लढाई भारताला जिंकायची आहे. पण ही अर्धी लढाई जिंकण्याआधी टीम इंडियासाठी गुडन्यूज आली आहे.
advertisement
टीम इंडियाची सर्वांत मोठी ताकद रिषभ पंत उद्या पाचव्या दिवशी फलंदाजीला उतरणार आहे.त्यामुळे टीम इंडियाची ताकद हमखास वाढणार आहे.आता जर शुभमन गिल आणि केएल राहुलने आपआपली शतकं ठोकून टीम इंडियाने 137 धावांची आघाडी गाठली, या दरम्यान जर टीम इंडियाजवळ जर पाच-सहा विकेट शिल्लक राहिल्या तर टीम इंडिया नक्कीच हा सामना ड्रॉ पर्यंत तर नक्कीच पोहोचू शकते.त्यामुळे आता उद्या काय होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement

सामन्याच्या पहिल्या दिवशी पाय फ्रॅक्चर

मॅचेस्टर सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीप मारताना रिषभ पंतच्या पायाला बॉल लागला होता.यामुळे रिषभ पंतच्या पायाला सूज आली होती आणि रक्त देखील वाहिले होते.त्यामुळे मैदानात अॅम्ब्यूलन्स मागलवून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची मााहिती दिली होती. तसेच त्याला सहा आठवड्यासाठी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता.यावेळी रिषभ पंत 47 बॉलमध्ये 37 धावा करून रिटायर्ड आऊट झाला होता.
advertisement
रिषभ पंतची दुखापत पाहता तो मैदानात उतरेल याची शक्यता फार कमीच होती. पण संघाची गरज लक्षात घेऊन तो पहिल्या डावात मैदानात उतरला होता. यावेळी मॅचेस्टरच्या सर्व प्रेक्षकांनी उभं राहुन टाळ्या वाजवून त्याचं मैदानात स्वागत केलं होतं. या स्वागतानंतर त्याने आपली लढाऊवृत्ती दाखवत 67 बॉलमध्ये आपलं 53 अर्धशतक पुर्ण केलं होत. या शतकानंतर एक धावा करून 54 धावांवर तो आऊट झाला होता.विशेष म्हणजे दुखापतीनंतर तो 27 बॉल खेळला होता.
advertisement

चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :

यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज

चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :

जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : टीम इंडियासाठी गूडन्यूज,पाचव्या दिवशी मॅच पलटणार, इंग्लंडच्या हातून मॅच निसटणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement