Jasprit Bumrah : 'बुमराह खेळला नाही, त्याच मॅच जिंकलो...', सचिन तेंडुलकरने केली ट्रोलर्सची बोलती बंद!

Last Updated:

इंग्लंडविरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज टीम इंडियाने 2-2 ने ड्रॉ केली आहे. भारताच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावरून जसप्रीत बुमराहवर निशाणा साधण्यात येत आहे.

'बुमराह खेळला नाही, त्याच मॅच जिंकलो...', सचिन तेंडुलकरने केली ट्रोलर्सची बोलती बंद!
'बुमराह खेळला नाही, त्याच मॅच जिंकलो...', सचिन तेंडुलकरने केली ट्रोलर्सची बोलती बंद!
मुंबई : इंग्लंडविरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज टीम इंडियाने 2-2 ने ड्रॉ केली आहे. भारताच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावरून जसप्रीत बुमराहवर निशाणा साधण्यात येत आहे. बुमराह या सीरिजमधल्या ज्या 3 टेस्ट मॅच खेळला त्यातल्या 2 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला, तर एक मॅच ड्रॉ झाली, म्हणजेच संपूर्ण दौऱ्यात बुमराह ज्या मॅच खेळला, त्यातल्या एकही सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला नाही. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बुमराहवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भारताने दोन टेस्ट जिंकल्या, हा केवळ योगायोग आहे. बुमराह हा अजूनही असाधारण आणि अविश्वसनीय असा बॉलर असल्याचं सचिन म्हणाला आहे. वर्कलोड मुळे जसप्रीत बुमराह सीरिजच्या 3 मॅच खेळला.
'मला माहिती आहे की लोक अनेक गोष्टींवर चर्चा करत आहेत. ज्या सामन्यांमध्ये तो खेळला नाही त्या आम्ही जिंकल्या. मला वाटते की हा केवळ एक योगायोग आहे', असं सचिन म्हणाला. जसप्रीत बुमराहने या सीरिजच्या 3 सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या.
advertisement
सचिन तेंडुलकरने रेडिटवर भारत-इंग्लंड सीरिजच्या विश्लेषणाचा व्हिडिओ केला आहे. 'बुमराहने खरोखर चांगली सुरूवात केली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये तो खेळला नाही. यानंतर तिसऱ्या-चौथ्या टेस्टमध्ये तो खेळला. लॉर्ड्स टेस्टच्या इनिंगमध्येही त्याने 5 विकेट घेतल्या. बुमराहची बॉलिंग असाधारण आहे, त्याने आजपर्यंत जे केलं आहे ते अविश्वसनीय आहे. बुमराह सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, यात शंका नाही. मी त्याला इतर कोणत्याही बॉलरपेक्षा चांगलं मानतो', अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.
advertisement
जसप्रीत बुमराहने 48 टेस्टमध्ये 219 विकेट घेतल्या आहेत, तर मोहम्मद सिराजला 41 टेस्टमध्ये 123 विकेट मिळाल्या आहेत. मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्टमध्ये 23 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज या सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah : 'बुमराह खेळला नाही, त्याच मॅच जिंकलो...', सचिन तेंडुलकरने केली ट्रोलर्सची बोलती बंद!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement