IND vs PAK : पाकिस्तानच काही खरं नाही, एकटा वैभव सूर्यवंशी घाम फोडणार, हायव्होल्टेज सामना कधी, कुठे, किती वाजता पाहता येणार?

Last Updated:

India vs Pakistan Asia Cup 2025 : अंडर 19 आशिया कपमध्ये पहिल्याच सामन्यात युएईचा 234 धावांनी धुव्वा उडवणाऱ्या टीम इंडियाची आता पाकिस्तानसोबत लढत होणार आहे. ही लढत हायव्होल्टेज असणार आहे.

India vs Pakistan Asia Cup 2025
India vs Pakistan Asia Cup 2025
India vs Pakistan Asia Cup 2025 : अंडर 19 आशिया कपमध्ये पहिल्याच सामन्यात युएईचा 234 धावांनी धुव्वा उडवणाऱ्या टीम इंडियाची आता पाकिस्तानसोबत लढत होणार आहे. ही लढत हायव्होल्टेज असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी गोलंदाजांचा कसा समाचार घेतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर उद्या रविवारी क्रिकेट फॅन्ससाठी सुपरसंडे असणार आहे. कारण रविवारी अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तानमध्ये हायव्होल्टेज लढत होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार आहे. त्यामुळे या सामन्याचे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान हा सामना कधी पार पडणार आहे? हे जाणून घेऊयात.

भारत-पाकिस्तान अंडर-19 आशिया कप सामना कधी होईल?

advertisement
भारत-पाकिस्तान अंडर-19 आशिया कप एकदिवसीय सामना रविवार,14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल.

सामना कुठे होईल?

भारत अंडर-19 विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप एकदिवसीय 2025 सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?

भारत अंडर-19 विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप एकदिवसीय 2025 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल आणि सोनीलिव्हवर स्ट्रीम केला जाईल.
advertisement
भारत अंडर 19 संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकिपर), कनिष्क चौहान, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, हरवंश पनगालिया, नमन पुष्पक, युवराज गोविंद, गोविंद मोहन
पाकिस्तान U19 संघ: उस्मान खान, समीर मिन्हास, अली हसन बलोच, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हमजा जहूर (विकेटकिपर), हुजैफा अहसान, निकाब शफीक, दानियाल अली खान, मोहम्मद सय्यम, अली रझा, अब्दुल सुभान, मोहम्मद हुजैफा, मोमीन कमर, मोहम्मद शायन
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानच काही खरं नाही, एकटा वैभव सूर्यवंशी घाम फोडणार, हायव्होल्टेज सामना कधी, कुठे, किती वाजता पाहता येणार?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement